BEED : माझ्या मुलावर अन्याय करु नका, त्याला सोडा; वाल्मिक कराडच्या आईची मागणी

BEED : खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या वयोवृद्ध आईने परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पारुबाई बाबुराव कराड असे त्यांचे नाव असून सकाळपासून त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. एकीकडे आज वाल्मिक करडाची सीआयडी कोठडी संपणार असून त्याला केज न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशातच कराडच्या आईने हे आंदोलन सुरू केले … Read more

KOLHAPUR | महाराणी ताराराणी यांच्या 350 व्या जन्म वर्षानिमित्त चित्ररथाचे उद्घाटन

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचलनालय मुंबई यांच्या वतीने महाराणी ताराराणी यांच्या 350 व्या जन्म वर्षानिमित्त चित्ररथ उद्घाटन नुकतेच पार पडले. कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ परिसरात हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार मुंबईहून ऑनलाईन उपस्थित होते. तर मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती, … Read more

KALYAN | कल्याणमध्ये चायनीज मांजा विकणाऱ्या सहा दुकानदारांवर पोलिसांची कारवाई

मंकर संक्रातीनिमित्त पतंग उडविले जातात. पंतगासाठी साधा मांजा वापरणे बंधनकारक आहे. मात्र अनेक दुकानदार पतंगासाठी चायनीज मांजा वापरला जातो. हा मांजा धारदार असल्याने हवेत उडणाऱ्या पक्षांना आणि नागरिकांना गंभीर इजा होऊ शकते. या चायनीज मांजाच्या विरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे. चायनीज मांजा विकणाऱ्या सहा दुकानदारां विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यापैकी दोन जण … Read more

KALYAN | मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगप्रेमींची पतंग खरेदीसाठी गर्दी

मकर संक्रांत सणाला अवघा एकच दिवस उरला असताना बाजारपेठेत पतंगप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दुकाने रंगीबेरंगी पतंगांनी सजली असून, विविध प्रकारचे मांजेही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खास मुलांना आकर्षित करण्यासाठी कार्टून पतंगांची मागणी वाढली आहे. मकर संक्रांत सणाच्या आदल्या दिवशी पतंग खरेदीसाठी कल्याण डोंबिवलीत मोठ्या प्रमाणावर लगबग सुरू आहे. बाजारपेठांमध्ये लहान, मोठ्या आणि आकर्षक डिझाईन्सच्या … Read more

CHANDRAPUR | ऊर्जानगर येथील स्थानिक नागरिकांचे प्रदूषणा विरोधात आमरण उपोषण

चंद्रपुरापासून काही अंतरावर असलेल्या वेकोली दुर्गापूर सीएचपी बंकर आणि सीएसटीपीएस रोप वे वरून मोठ्या प्रमाणात कोळशाची धूळ उडत असते. दोन्ही विभागांना वारंवार विनंती करूनही प्रदूषणात कोणतीही घट झालेली नाही. धुळीमुळे ग्रामस्थांना उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेता, भाजप अनुसूचित जात जमात आघाडीचे चंद्रपूर तहसील अध्यक्ष नंदू इंगळे यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी रोपवे गेटसमोर बेमुदत उपोषण सुरू केले … Read more

KALYAN | डोंबिवलीत मानपाडा पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या

कल्याण डोंबिवली परिसरात अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी गस्ती दरम्यान गांजा विकण्याचा प्रयत्नात असणाऱ्या एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत कल्याण पूर्व टाटा नाका परिसरात त्याला सापळा रचत अटक केली आहे. पप्पू राठोड असे या गांजा तस्करी करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील देखील गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलीस … Read more

CHH.SAMBHAJINAGAR | जाधववाडी भाजी मंडीमध्ये पालेभाज्यांचे दर घसरले; मेथी,पालक,कोथिंबीरची कवडीमोल भावात विक्री

छत्रपती संभाजी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीतील जाधव वाडी भाजी मंडीमध्ये सध्या भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी व विक्रेता संकटात सापडला आहे. यावर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने सध्या सर्व पिके चांगली आली आहेत.

SOLAPUR | अवघ्या कांही वेळात सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मिरवणुकीला होणार सुरुवात

– हिरेहब्बू वाडा ते सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरापर्यंत निघणार भव्य दिव्य मिरवणूक – सात मानाच्या नंदी ध्वजासह सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखी आणि योगदंडासह निघणार मिरवणूक – आज सिद्धरामेश्वरांच्या योगदंडासोबत कुंभार कन्येचा प्राथिनिधिक स्वरूपात पार पडणार विवाह सोहळा – संमती कट्ट्यावरती लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार अक्षता सोहळा  

SOLAPUR | सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याला माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची हजेरी

– पत्नी उज्वला शिंदे यांच्यासोबत सुशीलकुमार शिंदे यांनी लावली आहे अक्षता सोहळ्याला हजेरी – अवघ्या काही वेळात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडासोबत कुंभारकान्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडणार – मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर सात मानाच्या नंदी ध्वजाचे आगमन झालयानंतर पार पडणार विवाह सोहळा    

NAVI MUMBAI | तीळ महागल्याने लाडूंच्या दरात वाढ

उद्या नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत आहे. संपूर्ण राज्यात मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणात तिळगुळाचे लाडू, रेवड्या आदी मिष्ठान्नासोबत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे बोलण्याची सांस्कृतिक परंपरा आहे. मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकू सारख्या महिलांच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात तिळाच्या लाडूंची विक्री होते. तर यंदाही बाजारात तिळाच्या लाडूंना काही दिवसांपूर्वी मोठी मागणी होती. मात्र तीळ महागल्याने … Read more