Home » Uncategorized » KOLHAPUR | महाराणी ताराराणी यांच्या 350 व्या जन्म वर्षानिमित्त चित्ररथाचे उद्घाटन

KOLHAPUR | महाराणी ताराराणी यांच्या 350 व्या जन्म वर्षानिमित्त चित्ररथाचे उद्घाटन

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचलनालय मुंबई यांच्या वतीने महाराणी ताराराणी यांच्या 350 व्या जन्म वर्षानिमित्त चित्ररथ उद्घाटन नुकतेच पार पडले. कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ परिसरात हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार मुंबईहून ऑनलाईन उपस्थित होते. तर मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक हे व्यासपीठावर उपस्थित होते. महाराणी ताराराणी यांच्या जीवन कार्याची महती सांगणारा हा चित्ररथ कोल्हापुरात जिल्हाभरात विविध ठिकाणी फिरणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसंचालक श्रीराम पांडे यांनी दिली आहे. तर या चित्ररथाची वैशिष्टये कला दिग्दर्शक डॉ. सुमित पाटील यांनी सांगितली आहेत.

Leave a Comment

hacklink jojobetjojomeritkingmeritking girişhacklink panel