मकर संक्रांत सणाला अवघा एकच दिवस उरला असताना बाजारपेठेत पतंगप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दुकाने रंगीबेरंगी पतंगांनी सजली असून, विविध प्रकारचे मांजेही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खास मुलांना आकर्षित करण्यासाठी कार्टून पतंगांची मागणी वाढली आहे. मकर संक्रांत सणाच्या आदल्या दिवशी पतंग खरेदीसाठी कल्याण डोंबिवलीत मोठ्या प्रमाणावर लगबग सुरू आहे.
बाजारपेठांमध्ये लहान, मोठ्या आणि आकर्षक डिझाईन्सच्या पतंगांनी दुकाने बहरली आहेत. मुलांमध्ये छोटा भीम, डोरेमोन आणि इतर कार्टून डिझाईनच्या पतंगांना विशेष पसंती मिळत आहे. दोन रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत पतंगांची विक्री होत आहे, तर वीस रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या मांज्यांची विक्री होत आहे. यामध्ये कागदी, प्लास्टिक कोटेड, आणि कॉटन मांज्यांचा समावेश आहे.
https://www.youtube.com/watch?v=SvdfLB0H_Os&ab_channel=SonyMarathi



