AMRAVATI | समृद्धी महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन हद्दीत आष्टा नजीक समृद्धी महामार्गावर ट्रॅवल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ट्रॅव्हल्स चालक हा जागीच ठार झाला असून 15 ते 16 प्रवासी जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पुणे वरून नागपूर जाणारी ही ट्रॅव्हल्स होती. यामध्ये अंदाजे 30 च्या जवळपास प्रवासी प्रवास करीत होते.घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस … Read more

NASHIK | दुबईतून पतंग प्रेमी येवल्यात दाखल

येवल्यात मकर संक्रात सण तीन दिवसीय पतंग उत्सव म्हणून साजरा केला जातो. मोठ्या प्रमाणात पतंग प्रेमी पतंग उडवून हा सण साजरा करता दिसत आहेत. पतंग उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या नव्हे तर देशभरातून पतंग प्रेमी येवल्यात दाखल झाले असून दुबई येथून आलेले नागरिकांनी देखील यावेळी पतंगबाजीचा आनंद घेतला.

DHULE | सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत आक्षेपार्य फोटो काढून खंडणी मागणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश

धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत एकांत स्थळी बोलवत संबंधित व्यक्तीचे आक्षेपार्य फोटो काढून त्याच्याकडून 12 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने तपास करत या टोळीच्या मुस्क्या आवळल्या असून याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.   धुळे … Read more

NASHIK | नायलॉन मांजाने गळा चिरल्याने नाशिक मध्ये सोनू धोत्रे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू

मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशीच नाशिकमध्ये गालबोट लागले आहे नायलॉन माजांने गळा शिरल्याने एका युवकाचा दुर्दैवी असा मृत्यू झालाय सोनू किसन धोत्रे या युवकाचा अवघ्या चार महिन्यांवर लग्न होतं आणि तो सणानिमित्त नाशिकला आला असताना माजांने गळा शिरला आणि त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झाला.नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे आणि जिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला या … Read more

CHH.SAMBHAJINAGAR | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 31 वा नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात साजरा

आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराला तब्बल 31 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्त मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून दलित बांधव मोठ्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येत असतात. आज नामविस्तार दिनानिमित्त मोठ्या संख्येने दलित नेते देखील त्या ठिकाणी येतात. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणांमुळे संपूर्ण परिसर … Read more

BULDHANA | मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्याचा मृत्यू; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरालगत असलेल्या श्री संत गजानन महाराज मतिमंद विद्यालयातील एका अकरा वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मृत्यूचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.. शेगाव येथील श्री गजानन महाराज निवासी मतिमंद निवासी विद्यालयात एकूण 100 विद्यार्थी निवासी पद्धतीने शिक्षण घेतात. यामध्ये सोमवारी रात्री विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या पोटात त्रास … Read more

BEED : माझ्या मुलावर अन्याय करु नका, त्याला सोडा; वाल्मिक कराडच्या आईची मागणी

BEED : खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या वयोवृद्ध आईने परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पारुबाई बाबुराव कराड असे त्यांचे नाव असून सकाळपासून त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. एकीकडे आज वाल्मिक करडाची सीआयडी कोठडी संपणार असून त्याला केज न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशातच कराडच्या आईने हे आंदोलन सुरू केले … Read more

KOLHAPUR | महाराणी ताराराणी यांच्या 350 व्या जन्म वर्षानिमित्त चित्ररथाचे उद्घाटन

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचलनालय मुंबई यांच्या वतीने महाराणी ताराराणी यांच्या 350 व्या जन्म वर्षानिमित्त चित्ररथ उद्घाटन नुकतेच पार पडले. कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ परिसरात हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार मुंबईहून ऑनलाईन उपस्थित होते. तर मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती, … Read more

KALYAN | कल्याणमध्ये चायनीज मांजा विकणाऱ्या सहा दुकानदारांवर पोलिसांची कारवाई

मंकर संक्रातीनिमित्त पतंग उडविले जातात. पंतगासाठी साधा मांजा वापरणे बंधनकारक आहे. मात्र अनेक दुकानदार पतंगासाठी चायनीज मांजा वापरला जातो. हा मांजा धारदार असल्याने हवेत उडणाऱ्या पक्षांना आणि नागरिकांना गंभीर इजा होऊ शकते. या चायनीज मांजाच्या विरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे. चायनीज मांजा विकणाऱ्या सहा दुकानदारां विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यापैकी दोन जण … Read more

KALYAN | मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगप्रेमींची पतंग खरेदीसाठी गर्दी

मकर संक्रांत सणाला अवघा एकच दिवस उरला असताना बाजारपेठेत पतंगप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दुकाने रंगीबेरंगी पतंगांनी सजली असून, विविध प्रकारचे मांजेही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खास मुलांना आकर्षित करण्यासाठी कार्टून पतंगांची मागणी वाढली आहे. मकर संक्रांत सणाच्या आदल्या दिवशी पतंग खरेदीसाठी कल्याण डोंबिवलीत मोठ्या प्रमाणावर लगबग सुरू आहे. बाजारपेठांमध्ये लहान, मोठ्या आणि आकर्षक डिझाईन्सच्या … Read more