Home » Uncategorized » BULDHANA | मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्याचा मृत्यू; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

BULDHANA | मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्याचा मृत्यू; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरालगत असलेल्या श्री संत गजानन महाराज मतिमंद विद्यालयातील एका अकरा वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मृत्यूचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.. शेगाव येथील श्री गजानन महाराज निवासी मतिमंद निवासी विद्यालयात एकूण 100 विद्यार्थी निवासी पद्धतीने शिक्षण घेतात. यामध्ये सोमवारी रात्री विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या पोटात त्रास होण्यास सुरुवात झाली. यामध्ये प्रायमरी मध्ये शिकणाऱ्या ज्ञानेश आखरे या 11 वर्षीय विद्यार्थ्यांच्या शौचामधून रक्त जाण्याचा प्रकार उघडकीस आल्याने व्यवस्थापनाने त्यांना शेगावच्या सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

 

या ठिकाणी प्रथमोपचार केल्यानंतर विद्यार्थ्याला सुट्टी देण्यात आली. दरम्यान आज सकाळी पुन्हा या विद्यार्थ्याला त्रास होत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले असता तपासणी अंती डॉक्टरांनी या विद्यार्थ्याला मृत घोषित केले आहे. दुसरीकडे पोटदुखीमुळे आणखी चार विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. राजदीप रत्नदीप हिवाळे राहणार पांग्री तालुका बुलढाणा आणि अभिषेक वामन परीहार आंचरवाडी तालुका चिखली यांच्यावर शेगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान खामगावचे उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी रुग्णालयाला भेट देऊन याबाबतची माहिती जाणून घेतली. या मृत विद्यार्थ्याची तपासणी सुरु आहे त्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण समजेल अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली आहे.

https://www.youtube.com/shorts/rHfvWMrTU1o

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?