मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा सुरू असतानाच आता नेत्यांच्या भेटीगाठी देखील सुरू

महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शिवसेना ठाकरे गटासोबत युती संदर्भात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं. महाराष्ट्रासमोर आमची भांडणं, वाद हे किरकोळ आहे, त्यामुळे एकत्र येण्यात मला तरी कुठलीही अडचण वाटत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख  उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या भुमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला … Read more

जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे तिघांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. रामबनमध्ये भूस्खलन झाल्याने यात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भूस्खलनामुळे रामबन भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक नद्यांना पुर आल्यामुळे नागरीवस्तीत सुद्धा पाणीचपाणी झालं आहे. जम्मू काश्मीरच्या रामबनमध्ये अचानक मोठी ढगफुटी झाली आहे. यामुळे आलेल्या मोठ्या पाण्याच्या लोंढ्याने गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. रविवारची सकाळ येथील … Read more

पोलीस आणि विहिंपचे कार्यकर्ते आमनेसामने

मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे, वडाळ्यात रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये जोरदार राडा झाला आहे. पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. रॅलीदरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. विनापरवानगी रॅली काढण्यात आल्यानं हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे, पोलिसांनी विहिंपच्या … Read more

पोलीस आणि विहिंपचे कार्यकर्ते आमनेसामने

मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे, वडाळ्यात रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये जोरदार राडा झाला आहे. पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. रॅलीदरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. विनापरवानगी रॅली काढण्यात आल्यानं हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे, पोलिसांनी विहिंपच्या … Read more

ठाकरे बंधूंच्या युतीवर भुजबळ आनंदी

मला ठाकरे बंधु एकत्र आले तर खूप आनंद होईल. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी त्यांना बोलून समजवण्याचा प्रयत्न केला होता. आज ते एकत्र आले तर माझ्या इतका आनंद कोणाला होणार नाही. मी आज वेगळ्या पक्षात आहे. आमच्यात मतभेद आहे. पण शिवसेनेसाठी आमच्या मनात आदर आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे … Read more

संग्राम थोपटेंनी स्पष्टपणे बोलून दाखवली मनातील खदखद

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. ते येत्या 22 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, पक्षाकडून आपल्याला डावलण्यात आल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांचं म्हणण आहे की तुम्ही गेले अनेक वर्ष काँग्रेसचं काम करत आहात, आणि हे काम करत असताना सातत्यानं तुम्हाला पक्षाच्या माध्यमातून … Read more

जैन मंदिर पाडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याची हकालपट्टी

विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मंदिर तोडक कारवाईनंतर निघालेल्या मोर्चानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी नवनाथ घाडगे यांच्या हकालपट्टीचा आदेश काढला गेला. वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांच्या आदेशाने पालिका कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दिगंबर जैन मंदिरावर तोडक कारवाई केली होती. याच मंदिर तोडक कारवाई … Read more

इंग्रजी चालते मग हिंदी का नको? फडणवीसांचा सवाल

यंदापासून महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असून त्यानुसार, सर्व शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली. या नव्या शैक्षणिक धोरणानुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनासाठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा असून ती अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र या निर्णयाला राज्यातून कडाडून विरोध होत असून त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं … Read more

हिंदीला राष्ट्रभाषा म्हणाल्यानंतर बावनकुळेनी मागितली माफी

सध्या महाराष्ट्रात मराठी भाषा विरुद्ध हिंदी भाषा असा वाद सुरु आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. टोकाचा संघर्ष होईल असं मनसेचे मुंबई शहरध्यक्ष संदीप देशपांडे म्हणाले. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रामाणिकपणे आपल्या एका चुकीची कबुली दिली आहे. “राजकारण होत आहे, खरतर … Read more

लाडक्या बहिणींना २१०० देण्यावरून महायुतीच्या मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

राज्यातील विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरत घसघशीत बहुमताने महायुती सरकारला पुन्हा सत्तेवर आणण्यात महत्वाचा वाटा बजावणारी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही सुरू झाल्यापासूनच चर्चेत आहे. 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत कोट्यावधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून जुलै ते मार्च अशा 9 महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले … Read more