Home » Today In Focus » जैन मंदिर पाडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याची हकालपट्टी

जैन मंदिर पाडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याची हकालपट्टी

विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मंदिर तोडक कारवाईनंतर निघालेल्या मोर्चानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी नवनाथ घाडगे यांच्या हकालपट्टीचा आदेश काढला गेला.

वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांच्या आदेशाने पालिका कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दिगंबर जैन मंदिरावर तोडक कारवाई केली होती. याच मंदिर तोडक कारवाई प्रकरणी जैन समाजाच्या लोकांनी विलेपार्लेपासून अंधेरी पूर्वमधील पालिकेच्या विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर महापालिकेने या अधिकाऱ्यावर कारवाई केली.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?