Home » धरम » पोलीस आणि विहिंपचे कार्यकर्ते आमनेसामने

पोलीस आणि विहिंपचे कार्यकर्ते आमनेसामने

मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे, वडाळ्यात रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये जोरदार राडा झाला आहे. पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. रॅलीदरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. विनापरवानगी रॅली काढण्यात आल्यानं हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे, पोलिसांनी विहिंपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतलं आहे.

रामनवमीनिमित्त विश्व हिंदू परिषदेकडून शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोभायात्रेला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील विश्व हिंदू परिषदेकडून रॅलीचं आयोजन करण्यात आलं. त्यामुळे जोरदार राडा झाला, पोलीस आणि विहिंपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप देखील कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे, या घटनेत काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान विनापरवानगी रॅली काढल्यामुळे काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?