Home » Today In Focus » हिंदीला राष्ट्रभाषा म्हणाल्यानंतर बावनकुळेनी मागितली माफी

हिंदीला राष्ट्रभाषा म्हणाल्यानंतर बावनकुळेनी मागितली माफी

सध्या महाराष्ट्रात मराठी भाषा विरुद्ध हिंदी भाषा असा वाद सुरु आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. टोकाचा संघर्ष होईल असं मनसेचे मुंबई शहरध्यक्ष संदीप देशपांडे म्हणाले. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रामाणिकपणे आपल्या एका चुकीची कबुली दिली आहे. “राजकारण होत आहे, खरतर काल मी बोलताना चुकून हिंदीला राष्ट्रभाषा म्हटलं, मी त्याऐवजी राजभाषा म्हणायला हवं होत. हिंदी राजभाषा आहे. काल मी म्हटलं ती राष्ट्रभाषा आहे” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

“माझ्या म्हणण्याच तात्पर्य असं होतं की, हिंदी राजभाषा आहे, यावरुन यावरुन काही लोकांनी टिकाटिप्पणी केली. या देशात विकासाच पाऊस उचललं, की ते थांबवण्याच काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं” असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले. “मराठी अस्मिता, मराठी माणसाकरीता, मराठीच आमची भाषा असली पाहिजे” असं बावनकुळे म्हणाले.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?