वानखेडे स्टेडियमचा नामकरण सोहळा

वानखेडे स्टेडियमवर तीन स्टँडचं नामकरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. तीन स्टँडला दिग्गजांची नावं देण्यात आली. रोहित शर्मा स्टँड, अजित वाडेकर स्टँड आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांचं नाव स्टँडला देण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. यासह मुंबई इंडियन्सचे खेळाडू, माजी टीम इंडियाचा कर्णधार रवि शास्त्री आणि दिलीप वेंगसरकर … Read more

गुलाबराव पाटील संजय राऊतांवर कडाडले

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या  ‘नरकातील स्वर्ग’  या पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोट केले आहेत.  ‘गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली’ असा दावा त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये केला आहे. संजय राऊत यांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर … Read more

भाजपचा आणखी एक नेता बरळला

ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय लष्कराने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. मात्र भारत पाकिस्तान तणावादरम्यान, भारताची बाजू मांडणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल भाजपाचे नेते तथा मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केले. या विधानानंतर चांगलाच वाद निर्माण झाला. त्यानंतर आता मध्य प्रदेशच्याच उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय सैन्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता नवा वाद … Read more

नीलम गोऱ्हे यांचे लाडका बहिणी संदर्भात मोठं वक्तव्य

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र जर आमची सत्ता पुन्हा आली तर आम्ही 2100 रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीकडून करण्यात आली होती, मात्र अजूनही … Read more

भारत पाक युद्धात पाकचे प्रचंड नुकसान

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तान आणि POK मध्ये घुसून फक्त दहशतवादी तळांवर कारवाई केली आहे.  पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील कारवाई आपल्यावरचा हल्ला मानून भारतावर प्रतिहल्ल्याची चूक केली. मात्र, त्याची मोठी किंमत पाकिस्तान लष्कर आणि पाकिस्तान एअर फोर्सला चुकवावी लागली. सर्वसामान्य पाकिस्तानी जनतेपासून सत्य लपवून तिथे विजयाचे खोटे ढोल बडवले जात आहेत. पाकिस्तानात किती नुकसान … Read more

शेतकऱ्यांचा भर पावसात रेल्वे रुळांवर ठिय्या

सांगलीमधून मोठी बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला यासाठी शेतकरी आक्रमक झाले. बाधित शेतकऱ्यांकडून रुळांवरच ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. तब्बल सहा तास शेतकऱ्यांनी रुळावर आंदोलन केलं. या आंदोलनाचा मोठा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पुण्याहून मिरज, कोल्हापूर आणि कर्नाटककडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.  … Read more

या कारणास्तव विराटची निवृत्ती टळू शकली असती…

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या निवृत्तीनंतर अनेक चर्चांना उधाण आले. सोशल मीडिया तर संपूर्ण विराटमय झालेलं पाहायला मिळालं. निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी विराट कोहलीने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी कोणतीही चर्चा केली नाही, असे सांगितलं जात आहे. आगामी काही दिवसांत भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामन्यांची एक मालिका होणार आहे. … Read more

ओवेसींनी दिलं पाकला ओपन चॅलेंज

भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हापासून संघर्षाला तोंड फुटलंय तेव्हापासून असद्दुदीन ओवैसी हेदेखील रोखठोक भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांनी वेळोवेळी पाकिस्तानला त्याची जागा दाखवली आहे. पहलगामवर दहशसतवादी हल्ला झाल्यानंतर ओवैसी यांनी त्या घटनेचा जाहीर निषेधही केला होता. दरम्यान, आता ओवैसी यांनी पाकिस्तानाला पुन्हा एकदा डिवचलं आहे. त्यांनी पाकिस्तानची थेट इज्जतच काढली आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी नुकतंच … Read more

भारताने लष्कराचं सामर्थ्य कसं सिद्ध केलं

भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची सध्या जगभरात चर्चा होत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारताने आपले लष्करी सामर्थ्य संपूर्ण जगाला दाखवले आहे. विशेष म्हणजे भारताच्या या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे आर्थिक तसेच सामरिक नुकसान झाले आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर राबवताना भारताच्या तिन्ही दलाने आपले शौर्य दाखवले. त्यामुळे हे ऑपरेशन नेमके कसे राबवण्यात आले. भारताच्या लष्कराने पाकिस्तानवर कशी कारवाई … Read more

दहावीचा निकाल आज जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज 13 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी नुकताच दहावीच्या निकालाची काही वैशिष्ट्ये पत्रकार परिषदेत जाहीर केली आहेत. यावेळी त्यांनी विभागीय टक्केवारी … Read more