Home » Today In Focus » भाजपचा आणखी एक नेता बरळला

भाजपचा आणखी एक नेता बरळला

ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय लष्कराने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. मात्र भारत पाकिस्तान तणावादरम्यान, भारताची बाजू मांडणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल भाजपाचे नेते तथा मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केले. या विधानानंतर चांगलाच वाद निर्माण झाला. त्यानंतर आता मध्य प्रदेशच्याच उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय सैन्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी देशाची सेना तसेच लष्कराबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. ते जबलपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सिव्हिल डिफेन्स व्हॉलेंटियर्सच्या प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते. संपूर्ण देश, देशाची सेना आणि सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक आहे, असं वादग्रस्त विधान त्यांनी या कार्यक्रमात केलंय. याच विधानाचा आधार घेत देवडा यांनी भारतीय सेनेचा अवमान केला आहे, असा आरोप केला जातोय.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?