Home » आंतरराष्ट्रीय » भारत पाक युद्धात पाकचे प्रचंड नुकसान

भारत पाक युद्धात पाकचे प्रचंड नुकसान

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तान आणि POK मध्ये घुसून फक्त दहशतवादी तळांवर कारवाई केली आहे.  पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील कारवाई आपल्यावरचा हल्ला मानून भारतावर प्रतिहल्ल्याची चूक केली. मात्र, त्याची मोठी किंमत पाकिस्तान लष्कर आणि पाकिस्तान एअर फोर्सला चुकवावी लागली. सर्वसामान्य पाकिस्तानी जनतेपासून सत्य लपवून तिथे विजयाचे खोटे ढोल बडवले जात आहेत. पाकिस्तानात किती नुकसान झालय, त्याची आता हळूहळू खरी माहिती समोर येऊ लागली आहे. पाकिस्तानने 7-8 तारखेच्या रात्री 15 आणि 8-9 तारखेच्या रात्री भारताच्या 26 शहरांवर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सर्वसामान्य भारतीय नागरिकांसोबत सैन्य तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. सर्तक असलेल्या भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी पाकिस्तानचे हे दोन्ही हल्ले यशस्वी रित्या परवतून लावले.

पण त्यानंतर पाकिस्तानला अद्दल घडवणारी कारवाई केली. 7 ते 10 तारखेदरम्यान भारतीय सैन्य दलांनी जो पराक्रम दाखवला, तो पुढची काही वर्ष पाकिस्तान निश्चित विसरणार नाही. भारताच्या कारवाईत पाकिस्तानच किती नुकसान झालय, त्याची माहिती समोर येऊ लागली आहे. भारताने अत्यंत अचूकतेने पाकिस्तानातील जवळपास डझनभर हवाई तळांवर हल्ला चढवला. यात पाकिस्तान एअर फोर्सच भयंकर नुकसान झालं आहे. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअर फोर्सचं 20 टक्के इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट झालं. यात अनेक पाकिस्तानी फायटर विमान सुद्धा आहेत. अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिल आहे.

Leave a Comment