खळबळजनक: हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात..

हिंजवडी फेज वनमध्ये परिसरात कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली. या घटनेत चालकाच्या पायाखाली अचानक आग लागल्याने चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. शहरातील हिंजवडी टेम्पो जळीतकांड घटनेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा अपघात नसून घातपात असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासणीतून पुढे आलं आहे. त्यामुळे, टेम्पोमधील कामगारांना जाळून मारण्यात आलं … Read more

छत्तीसगडमध्ये जवानांची उत्तम कामगिरी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा

छत्तीसगडमधील  बिजापूर-दंतेवाडा आणि कांकेर- नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर आज झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 30 नक्षलवाद्यांना ठार  करण्यात जवानांना यश आले आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. जवानांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम सुरु असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा राखीव रक्षक दल, विशेष कार्य दल आणि बस्तर फायटर्ससह संयुक्त सुरक्षा दलांनी नक्षल्यांविरोधात अभियान राबविले होते. यात … Read more

राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएससी अभ्यासक्रम लागू होणार

राज्य सरकारने शिक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएससी अभ्यासक्रम लागू होणार आहे. यासंदर्भात नेमलेल्या समितीने सीबीएसई अभ्यासक्रम राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना लागू करण्यास मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळात दिली. येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच म्हणजे २०२५-२०२६ या वर्षामध्ये सीबीएससी अभ्यासक्रम लागू करण्याबाबत हालचाली सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. … Read more

औरंगजेब वादावरून बच्चू कडूंनी सरकारला खडे बोल लगावले

औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यभरात वाद सुरू असताना राज्यात आणि देशात हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनत चालला का? असा सवाल प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार बच्चू कडू यांना केला असता त्यांनी यावर थेट भाष्य केलं. ‘औरंगजेबाच्या कारकिर्दीत जेवेढे लोकं मारले गेले नसतील त्यापेक्षा जास्त साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. कमल कसाई या धोरणामुळे हिंदू शेतकरी मेला पण या … Read more

सभागृहात चित्रा वाघ अनिल परबांची खडाजंगी

दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. यामध्ये आपल्या मुलीची आत्महत्या नसून बलात्कार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यात ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरे यांच्यावरही आरोप करण्यात आल्याने पुन्हा त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. याप्रकऱणावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी पहायला मिळाली असून ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि … Read more

दिशा सालियन प्रकरणी शिंदे गट आक्रमक

दिशा सालियनच्या अकस्मात मृत्यू प्रकरणी पाच वर्षांनंतर तिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सीबीआय चौकशीची मागणी देखील करण्यात येतेय, तर या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत आहेत आणि दिशाला न्याय मिळावा अशी मागणी … Read more

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा बलात्कार प्रकरणी एक अजब निर्वाळा

अलाहाबाद हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. बलात्कार प्रकरणात हा निर्णय आला आहे. या निकालाने एकच खळबळ उडाली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे इतर प्रकरणावर पण परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. अलाहाबाद हायकोर्टाने स्तन पकडणे अथवा पायजाम्याचा नाडा तोडणे हा बलात्कार नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तर हा एक गंभीर लैंगिक छळ असल्याचे म्हटले आहे. न्यायमूर्ती … Read more

दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण, आदित्य ठाकरेंसह किशोरी पेडणेकरांवरही गंभीर आरोप

दिशा सालियन हत्येच्या प्रकरणात तिच्या वडिलांनी आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेत दिशाच्या मृत्यूआधी पार्टीत आदित्य ठाकरे आणि इतर उपस्थित होते, सामूहिक बलात्कार झाला असा दावा आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट व सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले असल्याचा आरोप आहे. दिशा सालियन हिच्या हत्येप्रकरणात आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता … Read more

फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा  दाखल

नागपूरमध्ये सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला होता. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन हा संघर्ष उफाळला. दोन गटात राडा झाला. या प्रकरणात फहीम खान मास्टरमाइंड असल्याच समोर आलय. त्याच्या विरोधात पोलिसांनी मोठ पाऊल उचललं आहेच. पण तपासातून हादरवून टाकणारी माहिती समोर आली. हिंसाचाराला कारणीभूत ठरणारे व्हिडिओ कुठून आले? कुठल्या देशाच कनेक्शन समोर आलय? त्या बद्दल जाणून घेऊयात. नागपूरच्या … Read more

अनेक मंदिरांमध्ये भाविकांच्या संख्येत मोठी घट …

छत्रपती संभाजीनगर येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, भद्रा मारुती, गिरिजा देवी मंदिर, सुलीभंजन दत्त मंदिरासह अनेक मंदिरांमध्ये भाविकांच्या संख्येत मोठी घट झालेली पाहायला मिळतेय. देवगिरी किल्ल्यावर सहसा गर्दी असते, पण तिथेही लोकांची संख्या खूप रोडावली आहे. ही सर्व पर्यटन स्थळे एकमेकांजवळ आहेत. खुलताबाद येथे मुघल बादशाह औरंगजेबाची कबर सध्या वादाचा मुद्दा ठरली असून त्यावरून राज्यात वातावरण अक्षरश: … Read more