राज्य सरकारने शिक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएससी अभ्यासक्रम लागू होणार आहे. यासंदर्भात नेमलेल्या समितीने सीबीएसई अभ्यासक्रम राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना लागू करण्यास मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळात दिली. येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच म्हणजे २०२५-२०२६ या वर्षामध्ये सीबीएससी अभ्यासक्रम लागू करण्याबाबत हालचाली सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात सीबीएसई शाळांमध्ये शिक्षणाचा बाजार मांडला आहे. विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचे शुल्क काही शाळा घेत असतात. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी सीबीएसई प्रणालीचे शिक्षण घेऊ शकत नाही. यामुळे राज्य शासनाने महाराष्ट्र शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये सीबीएसई शिक्षण सुरु करण्यासंदर्भात सुकाणू समिती नेमली होती. या समितीने राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम लागू करण्याबाबतच्या आराखड्याला मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परीषदेत ही माहिती दिली. याबाबत आमदार प्रसाद लाड यांनी प्रश्न विचारला होता. त्याला दादा भूसे यांनी उत्तर हे दिले आहे.



