नितेश राणेंच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…..

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावर बोलले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 112 वी जयंती आहे. त्या निमित्ताने ते कराड प्रिती संगमावर अभिवादन करण्यासाठी आले होते. दिवंगत काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 112 वी जयंती आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्राचे … Read more

पुणे वाहतुक कोंडीवर उपायासाठी सरकार प्रयत्नशील, विधानसभेत केली घोषणा

अपघात होत असलेल्या ठिकाणी स्पीड ब्रेकर, सिग्नल सिस्टिम आणि अन्य सुरक्षात्मक उपाय करण्यावर भर देण्यात येईल. पुणे शहरात वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भातही निर्णय घेतला जाईल. पुणे शहरातील वाहतुकीची समस्या हा मोठा गंभीर विषय आहे. पुण्यातील रस्ते आणि वाहनांची संख्या यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर … Read more

जयंत पाटील यांच्या भाषणानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ

विधानसभा निवडणुकीत आमचा दारुण पराभव झाला आहे. राजू शेट्टी यांना माहिती आहे, निवडणुकीमध्ये किती पैसे वाटले जातात. त्यांना चांगला अनुभव आला आहे. आम्ही भाषण करुन दमलो आहोत. शक्तिपीठ महामार्गाविरोधात बुधवारी मुंबईत आंदोलन झाले. मुंबईतील आझाद मैदानात हजारो शेतकरी कुटुंबासह दाखल झाले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनासाठी मुंबईत आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना भेट देण्यासाठी … Read more

फडणवीस सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठं गिफ्ट, अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात मोठी घोषणा होण्याची शक्यता

मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला आता आणखी एक मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात याबाबत घोषणा होणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला, अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला होता, तर महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार मुसंडी मारली. महायुतीला राज्यात … Read more

नितेश राणेंच्या मुस्लिम विरोधी वक्तव्यावर संजय राऊतांनी मांडल परखड मत

“भारताच्या सैन्यात मुस्लिम सैनिक आहेत, पोलीस दलात मुस्लिम पोलीस आहेत. त्याचवेळी भारताच्या संरक्षण दलात डॉ. प्रदीप कुरुलकर सुद्धा आहेत. काश्मीरमध्ये जास्तीत जास्त शहीद होणारे मुस्लिम पोलीस आहेत. युद्धात मुस्लिम सैनिकांनी सुद्धा प्राणाच बलिदान देऊन या देशाच रक्षण केलं आहे हा इतिहास, वर्तमान तुम्हाला बदलता येणार नाही” असं संजय राऊत म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात … Read more

तर सुरेश धसही करणार पंकजा मुंडेंची तक्रार

शिस्तबद्ध भाजपमध्ये राजकीय वॉर,सुरेश धस-पंकजा मुंडे एकमेकांची तक्रार नेतृत्वाकडे करणार सुरेश धस सर्वत्र कॅमेरे घेऊन जातात, मग धनंजय मुंडे यांच्या भेटीच्या वेळी कॅमेरे का नेले नाही? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना सुरेश धस म्हणाले, मी कॅमेरे घेऊन जात नाही. कॅमेरे माझ्या मागे येतात. धनंजय मुंडे दावाखान्यात असल्यामुळे मी त्यांना भेटण्यास … Read more

भाजप-शिंदेंची शिवसेना या विषयावर आमने-सामने, ठाण्यात दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांमध्ये होणार संघर्ष

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघातील शीळ-तळोजा मार्गालगतची 14 गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र या निर्णयाला गणेश नाईक यांनी विरोध केला आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार भरवला. त्यानंतर कल्याण मतदारसंघातील शीळ-तळोजा मार्गालगतची 14 … Read more

मंत्री पंकजा मुंडे प्रथमच सुरेश धस यांच्याविषयी इतकं जाहीरपणे बोलल्या

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील अंतर्गत राजकारण ढवळून निघालं आहे. सत्ताधारी पक्षातील नेतेच आमने-सामने आले आहेत. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. आता आमदार पंकजा मुंडे प्रथमच सुरेश धस यांच्याविषयी जाहीरपणे बोलल्या आहेत. “वृत्तपत्रातील एका पत्रकाराने माझी मुलाखत घेतली. त्यांनी मला जे प्रश्न विचारले, त्यावर मी त्यांना सांगितलं, मी यावर उत्तर देणार नाही, कारण प्रश्नच मान्य नसल्याने … Read more

खोक्या’ची संपत्ती जप्त होणार?, बीडच्या पोलीस अधीक्षकांना पत्र, सुरेश धस यांच्यावरसुद्धा आरोप

शिरूरकासार येथील गुंड सतीश भोसले ऊर्फ खोक्याने २०० हरण्यांची शिकार केली असा आरोप करण्यात आला आहे. सतीश भोसले याने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भोसलेची प्रॉपर्टी जप्त करण्याची मागणी आता करण्यात आली आहे. बीडच्या शिरूरकासार येथील गुंड सतीश भोसले ऊर्फ खोक्या याच्यावर सातत्याने गंभीर आरोप होत आहेत. खोक्याने … Read more

डोंबिवलीमध्ये ६५ बेकायदा इमारत प्रकरणात कारवाई!

बनावट सातबारा बनवून सरकारची फसवणूक, गुन्हे दाखल करण्याचे तहसीलदारांने दिले पोलिसांना पत्र डोंबिवलीमध्ये मागील काही महिन्या पासून शहरातील ६५ बेकायदा इमारतींच्या प्रकरणी उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. या संदर्भात अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी एका तक्रारीची चौकशी करत असताना, सर्वे नंबर २९/५ वरील सातबारा उतारा बनावट पद्धतीने तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. … Read more