Home » Uncategorized » श्री. अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम विठ्ठल मंदिर देवघर (ता.खेड जि.रत्नागिरी )

श्री. अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम विठ्ठल मंदिर देवघर (ता.खेड जि.रत्नागिरी )

   वै.ह.भ.प. सद्‌गुरु ज्ञानेश्वर महाराज जाधव यांच्या आशीर्वादने या श्री. अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम यंदाचे हे ९६ वे वर्ष असून आनंदाने पारपाडण्यात आले.

   आपणांस कळविण्यात आनंद वाटतो की, सालाबाद प्रमाणे श्री. पांडुरंग कृपेने व वै. सद्‌गुरु निष्काम कर्मयोगी बत गाडगे महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व वै. स्वामी विजयानंद महाराज यांच्या प्रेरणेने व वै. सद्‌गुरु ज्ञानेश्वर महाराज यांच्या आशीर्वादाने मु. देवघर, ता. खेड, जि. रत्नागिरी येथे माघ शुक्ल पक्ष, रविवार ०२/०२/२०२५ ते रविवार ०९/०२/२०२५ पर्यंत श्री. अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम संपन्न झाला .

 

    गुरूवार दिनांक ०६/०२/२०२५ रोजी सकाळी १० ते १२ श्रीमद् ज्ञानेश्वरी ९ व्या व १२ व्या अध्यायांचे सामुदायिक ४३ वे पारायण ह.भ.प. रघुनाथ महाराज कदम, मु. तामसडे यांच्या नेतृत्वाने श्रीमद् ज्ञानेश्वरी ची अग्रपुजा मा. श्री. सुनिल बाबुराव मोरे (सरपंच, देवघर) यांच्या शुभहस्ते झाली . व तसेच एकूण ४०० ते ४५० विध्यर्थी श्रीमद् ज्ञानेश्वरी ९ व्या व १२ व्या अध्यायांचे सामुदायिक ४३ वे पारायण करण्यात आले असून. संपूर्ण देवघर ग्रामस्थ मंडळ उपस्थित राहून हा कार्यक्रम आनंदात पारपाडण्यात आला. संपूर्ण गावातील मुंबई चाखरमानी सुद्धा उपस्तिथ राहून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला .

 

*** वाचकिय सहकार्य ***

    ज्युनिअर कॉलेज आंबवली, ज्युनिअर कॉलेज तळे, न्यु इंग्लिश स्कूल आंबवली, तळे विभाग सेकंडरी स्कूल तळे, न्यु इंग्लिश स्कूल मोहाने, न्यु इंग्लिश स्कूल देवघर, न्यु इंग्लिश स्कूल मांडवे, नवजीवन हायस्कूल शिंगरी, शिवशंकर माध्ययिमक विद्यालय कुळवंडी, तसेच मराठी शाळा, देवघर, मोहाने, ऐनवली, महाळुंगे, कुडोशी, देवघर (निवाची वाडी). तसेच सदर वरील दिवशी वरील हायस्कूल मधील आणि मराठी शाळेतील प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या वि‌द्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम पारपाडण्यात आला .

 

   एकादशी निमित्त शनिवार दि ०८/०२/२०२५ रोजी वै.ह.भ.प. सद्‌गुरु ज्ञानेश्वर महाराज जाधव यांच्या आठव्या पुण्यस्मरण निमित्त ह.भ.प. लक्ष्मण महाराज कुंडगर, (अध्यापक, गाथामंदिर गुरूकूल श्री श्रेत्र देहू) यांचे किर्तन द तसेच रात्रौ ह.भ.प. प्रकाश महाराज पालकर, मु. तळे (चिंचवाडी) यांचे किर्तन आयोजित केले गेले होते. राजाराम धोंडबाराव मोरे यांच्या स्मरणार्थ श्री. शामराव रघुनाथ मोरे आणि बंधु देवघर (मधलीवाडी) यांजकडून पांडुरंगाच्या चरणी ध्वजा अर्पण कार्यक्रम पारपाडण्यात आला.

 

     शनिवार दि. ०८/०२/२०२५ एकादशी निमित्त रात्रौ ११ नंतर भारूडाचा दणदणीत कार्यक्रम श्री हनुमान प्रासादिक नाट्यरूपी भारूड भजन मंडळ, मांडकी (खुर्द), ता.चिपळून, जि.रत्नागिरी . बुवा : ह.भ.प. सुभाष डिके, शिवाजी धुमक बुवा सह तानाजी गुडेकर यांचा भारूडाचा दणदणीत कार्यक्रम पारपाडण्यात आला..

 

राजाराम धोंडबाराव मोरे यांच्या स्मरणार्थ श्री. शामराव रघुनाथ मोरे आणि बंधु देवघर (मधलीवाडी) यांजकडून पांडुरंगाच्या चरणी ध्वजा अर्पण कार्यक्रम पारपाडण्यात आला.

         (पांडूरंगाच्या कृपाशीर्वादाने विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे, आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, तरी सर्वांनी सढळ हस्ते मदत करावी. )

** प्रमुख पाहुणे ***

मा.श्री. ह.भ.प. नामदेव शेलार (दहिवली)
मा. श्री. बाबाजीराव जाधव (उपाध्यक्ष, जि.म. बँक, रत्नागिरी)
मा. श्री. सतीश कदम, मु. महाळुंगे (एम.बी.ए. कॉ., खेड)
मा. श्री. शामराव मोरे (सरपंच, मु. तळे)
मा. श्री. बाळासाहेब चौकेकर (सं-मुंबई पोस्टल को.ऑ.सो.लि.)
मा. श्री. रविद्रजी मोरे (मा. उपसभापती, पं.स. खेड)
मा. श्री. कवळे शेठ (उद्योजक, खेड)
मा. ह.भ.प. जगदिश सिंग (पप्पाजी) (उद्योजक, मुंबई)
मा. श्री. शांताराम शेठ सागवेकर, मु. भराडे (उद्योजक, मुंबई)
मा. श्री. आशिष कांतिलाल मिस्त्रि (उद्योजक, मुंबई)
मा. श्री. अनंत दत्ताराम मोरे (उद्योजक, मुंबई)
मा. श्री. कुंदनजी मोरे, तळे (उद्योजक)
मा. सौ. सुप्रियाताई पवार (मा. सभापती, पं.स.खेड)
मा. श्री. विजयराव गोगावले (सरपंच, उद्योजक, मु. आंबवली)
मा. श्री. विजयराव जाधव (मा. उपसभापती, मु. तळे)

*चालक*

ह.भ.प. निवृत्ती ज्ञानेश्वर जाधव .

ह.भ.प. पांडुरंग (बापू) ज्ञानेश्वर जाधव.

 

 

 

 

Vithu Mauli Tu Mauli Jagachi lyrics | विठू माऊली तू माऊली जगाची | Vitthal Aarti | Vitthal Bhaktigeet

 

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?