पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. मोनाली भिसे यांच्या उपचारासाठी अडीच लाख भरल्यानंतरही पूर्ण 10 लाख रुपये भरत नाही, तोपर्यंत उपचार करणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर महिलेनं दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. परंतु तिचा मृत्यू झाला. आता यावरुन शिवसेना संजय राऊतांनी टीका केली.

संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर टीका झाली. यावेळी त्यांनी राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. या पत्रकार परिषदेत त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या घटनेबद्दल विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी भाष्य केले. सरकारमध्ये हिंमत असेल तर रुग्णालयावर कारवाई करा. भिसे कुटुंब ज्या डॉक्टरांची नावे घेत आहेत, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत ?
“आमदार अमित गोरखे यांचे भिसे म्हणून पीए आहेत. या भिसेंची ती पत्नी आहे. विचार करा. भाजपच्या कार्यकर्त्याची पत्नी. तिच्यासाठी फडणवीस यांच्या कार्यालयातून रुग्णालयात फोन गेला असं सांगितलं जातं. तरीही त्या महिलेवर ही वेळ आली. एका मातेचा करूण अंत झाला. काय करतात फडणवीस. सरकारला १०० दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेत बसले आहेत. गोरगरीबांची कामे ही फडणवीस यांच्या लेव्हलची नाही. त्यांची लेव्हल खूप मोठी आहे. गोरगरीब मध्यमवर्गीय यांची कामे तडफडून मरतात, शेतकरी तडफडून मरतात,. योजना कागदावर आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात, पोपटपंची करत. फडणवीस यांची झेप मोठी आहे. अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला, ठेकेदार मोठमोठे. त्यांची कामे होत आहे. त्यांची लेव्हल ती आहे. त्यामुळे फडणवीस यांना त्यांच्या लेव्हलची कामे सांगितली पाहिजे. ते छोटेमोठे काम करणार नाही. त्यांच्या पक्षाला ही सवयच नाही. त्यांची लेव्हल खूप वर गेली आहे. असे भाजपचे कार्यकर्ते तडफडून मरत आहे, बायका मुले… आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले आहे”, अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली.




Users Today : 14