कुणाल कामराबद्दलची याचिका ऐकण्यास हायकोर्टाने दिला नकार

कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्याचा व्हिडीओ पुन्हा पोस्ट करणाऱ्या किंवा इतरांना शेअर करणाऱ्या कोणावरही सूडबुद्धीने कारवाई केली जाऊ नये, असं मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केलं आहे. कामरासारख्या उपसाहात्मक राजकीय टीका-टिप्पणी करणाऱ्या कॉमेडियन्सवर मनमानी पद्धतीने दाखल होणारे गुन्हे रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका ऐकण्यास खंडपीठाने … Read more

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांना जीवे मारण्याची धमकी

सातारा शहरातील पोवई नाका येथील भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांच्या जागेवर काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. याविषयी शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला माहिती दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला या बाबतचा तक्रारी अर्ज दिला होता. त्यानंतर अतिक्रमण करणाऱ्या व्यापारांवर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने संतापलेल्या एका व्यापाऱ्याने चक्क पोलिसांसमोरच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांना … Read more

चेन्नई सुपर किंग्सचा धोनी असताना ही पंजाब किंग्सने केला पराभव

आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना पार पडला आहे.  हा सामना पंजाब किंग्सने 18 धावांनी  सामना जिंकला आहे. पंजाब किंग्सचा या स्पर्धेतील तिसरा विजय आहे. या विजयासह पंजाब किंग्सने टॉप 4 मध्ये जागा मिळवली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. … Read more

विशाल ददलानीनी ‘इंडियन आयडॉल सोडण्याचे कारण अखेर सांगून टाकले

इंडियन आयडॉल’ हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिॲलिटी शोंपैकी एक आहे. संगीतकार आणि गायक विशाल ददलानी गेल्या सहा वर्षांपासून या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत होता. परंतु आता सहा वर्षांनंतर त्याने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्याचसोबत मोठी पोस्ट लिहित चाहत्यांना शो सोडल्याची माहिती दिली आहे. या … Read more

माणिकराव कोकाटेंवर अजित दादा भडकले

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे  यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या विधानामुळे चांगलाच वाद सुरू  झाला.  त्यांनी केलेल्या विधानाचा निषेध करून विरोधकांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. त्यानंतर कोकाटे यांनी त्यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. असे असतानाच आता बैठकीला अर्धात उशिराने पोहोचल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांना खडे बोल … Read more

वाढत्या महागाई वरून जयंत पाटील यांचा सरकारवर घणाघात

दीनानाथ हॉस्पिटलमध्ये अनामत रक्कम न भरल्याने ईश्वरी ( तनिषा ) भिसे या गर्भवती महिलेचा  मृत्यू झाल्याचे प्रकरण चांगलेच तापले. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीनेही अनामत रक्कम मागितल्याचा ठपका प्राथमिक अहवालात ठेवला असून त्यानंतर आता राजकीय वातावरण आणखीच तापले आहे. या रुग्णालयांकडून अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे देखील पुढे आले आहे, यातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे … Read more

आधार कार्ड मध्ये आलं नवं फेस ऑथेंटिफिकेशन फिचर

याआधी तुम्हाला एखाद्या हॉटेलमध्ये जायचे असेल किंवा कॉलेज किंवा अन्य ठिकाणी ओळख द्यायची असेल तर आधार कार्डची हार्ट किंवा सॉफ्ट कॉपी मागितली जायची. यापुढे मात्र असे होणार नाही. कारण UIDAI ने आधार कार्ड स्मार्ट फेस ऑथेंटिफिकेशन फीचर अॅड केलं आहे. या फिचरच्या मदतीने चेहऱ्याला स्कॅन करून आधार कार्डची ओळख पटणार आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी … Read more

राज्यात पुन्हा उत्तरभारतीय विरुद्ध मनसैनिक असा वाद

मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मान्यता रद्द करावी, यासाठी उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेच्या या भूमिकेनंतर मनसेकडून जाहीर इशारा देण्यात आला आहे. मनसेचे मुंबई शहरध्यक्ष संदीप देशपांडे यांनी … Read more

अमेरिकेचा चीन विरोधात मोठा निर्णय

चीन आणि अमेरिकेमधील व्यापारी तणावाने पुन्हा एकदा टोक गाठलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी धमकी दिली. नंतर थेट व्हाइट हाऊसने चीनवर 104 टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. हे आयात शुल्क 9 एप्रिलपासून लागू होणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयाकडे दोन्ही देशातील नव्या आर्थिक युद्धाची सुरुवात म्हणून पाहिलं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प … Read more

भारताचा माजी क्रिकेटर केदार जाधवचा अखेर भाजपात प्रवेश

माजी भारतीय क्रिकेटर केदार जाधवने क्रिकेटनंतर आता राजकारणात प्रवेश केला आहे. केदार जाधवने भाजप पक्षात प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांनी केदार जाधवला भाजपाचं सदस्यत्व दिलं. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्याने मला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचे काम करायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली … Read more