आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना पार पडला आहे. हा सामना पंजाब किंग्सने 18 धावांनी सामना जिंकला आहे. पंजाब किंग्सचा या स्पर्धेतील तिसरा विजय आहे. या विजयासह पंजाब किंग्सने टॉप 4 मध्ये जागा मिळवली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्सची सुरुवात काही चांगली झाली नाही. प्रभसिमरन सिंग खातंही न खोलता बाद झाला. त्यानंतर एकेरी धावा करत तंबूत परतण्याची शर्यत लागली होती. श्रेयस अय्यर 9, मार्कस स्टोयनिस 4, नेहल वढेरा 9 ग्लेन मॅक्सवेल 1 धाव करून बाद झाला. पण एका बाजूने प्रियांश आर्यने झंझावाती खेळी केली. त्याने 42 चेंडूत 7 चौकार आणि 9 षटकार मारत 103 धावांची खेळी केली. तर तळाशी असलेल्या शशांक सिंग आणि मार्को यानसेने जबरदस्त खेळी केली. शशांकने नाबाद 52 आणि मार्को यानसेनने नाबाद 34 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 219 धावा केल्या आणि विजयासाठी 220 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात सावध झाली. पण आक्रमक खेळी करण्यात ते अपयशी ठरले.





Users Today : 24