इंडियन आयडॉल’ हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिॲलिटी शोंपैकी एक आहे. संगीतकार आणि गायक विशाल ददलानी गेल्या सहा वर्षांपासून या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत होता. परंतु आता सहा वर्षांनंतर त्याने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्याचसोबत मोठी पोस्ट लिहित चाहत्यांना शो सोडल्याची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की, ‘दरवर्षी सहा महिन्यांसाठी मी मुंबईत अडकून पडू शकत नाही.’ त्याचप्रमाणे पुन्हा एकदा गाणी बनवण्याकडे कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करण्याकडे वळण्याचा उल्लेख त्याने यावेळी केला आहे.

“माझा प्रवास इथपर्यंतच होता. सलग सहा सिझन्सनंतर ‘इंडियन आयडॉल’चा परीक्षक म्हणून आज रात्रीचा माझा शेवटचा एपिसोड होता. या शोची मला जितकी आठवण येईल तितकाच या शोलाही माझी आठवण येईल अशी अपेक्षा करतो. श्रेया, बादशाह, आदित्य, आराधना, चित्रा, आनंदजी, सोनल, प्रतीभा, साहिल, सलोनी, मुस्कान, अभिषा, संपूर्ण प्रॉडक्शन क्रू, विलास, पक्या, कौशिक (पिंकी) आणि सर्व परीक्षक, गायकस संगीतकारांचे खूप खूप आभार. हा मंच माझ्यासाठी घरासारखा होता. इथे फक्त निर्मळ प्रेम होतं. हक्कापेक्षा जास्त प्रेम या शोद्वारे मिळालं आहे’, अशा शब्दांत विशालने भावना व्यक्त केल्या आहेत. विशाल हा ‘इंडियन आयडॉल’च्या दहाव्या सिझनपासून म्हणजेच 2018 पासून या शोचा परीक्षक होता.




Users Today : 24