एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी हे सध्या श्रीनगरच्या दौऱ्यावर आहेत. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांचा हा श्रीनगरचा दौरा महत्वाचा मानला जातो आहे. हल्ल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच काश्मीर दौरा आहे. या दौऱ्यात ओवैसी यांनी स्थानिक नेते आणि नागरिकांशी संवाद देखील साधला आहे.
यावेळी प्रसार माध्यमांना देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पहलगाममध्ये झालेला हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे. निष्पाप माणसांना त्यांचा धर्म विचारून मारणं बरोबर नाही. भारत सरकारने या घटनेला योग्य ते उत्तर द्यायला हवं. आम्ही सर्व पक्षीय बैठकीत देखील हे बोललो आहे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.




Users Today : 24