वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (Waves) ची मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. आज (1 मे ) मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झालं.शाहरुख खान, आमिर खान, अनिल कपूर, रजनीकांत, रणबीर कपूर यांच्यासह दाक्षिणात्य ते बॉलिवूडपर्यंत अनेक स्टार्सनी या कार्यक्रमात विशेष हजेरी लावली. बॉलिवूडमधील ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर हे देखील आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. न्यूज9ने आयोजित केलेल्या Wave समिटमध्ये दिग्दर्शक शेखर कपूर यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर संवाद साधला.

AI च्या प्रभावाबद्दलही त्यांची चर्चा झाली. ‘ खरं सांगू तर AI राक्षस नाहीये, (पण) आपण त्याला राक्षस बनवलं आहे. जे काम आपण 5 महिन्यांत करू शकतो तेच काम AI (हे) 5 मिनिटांत करू शकतं. मी नेहमीच ChatGPT शी बोलत असतो आणि तेही माझ्याशी बोलतं. AI अनिश्चित असू शकत नाही कारण ते डेटाद्वारे चालतं, पण आपण (माणसं) तसे नाहीयोत ‘ असं शेखर कपूर म्हणाले.
यावेळी शेखर कपूर यांनी ‘Storytelling in the age of AI (एआयच्या युगात स्टोरीटेलिंग)’ या विषयावरही चर्चा केली. यादरम्यान ते म्हणाले की, ‘मिस्टर इंडिया 2’ चित्रपटासाठी अनेक लोक त्यांच्याकडे पटकथा, स्क्रिप्ट घेऊन आले होते. पण त्यांच्या कूकने एक चांगली स्क्रिप्ट लिहीली होती. शेखर कपूर यांनी जेव्हा त्या कूकला याबद्दल विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की त्याने ही स्क्रिप्ट ChatGPT द्वारे लिहीली.




Users Today : 26