Home » ताज्या बातम्या » मालाड पिंपरिपाड्यात रस्त्याचे तीन तेरा, वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाचे दुर्लक्ष

मालाड पिंपरिपाड्यात रस्त्याचे तीन तेरा, वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाचे  दुर्लक्ष

मुंबईतील मालाड विभागात पिंपरी पाडा भाजी मार्केट ते क्वीन मेरी शाळपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम मुंबई महानगरपालिका गेल्या दोन वर्षांपासून करत आहेत. जे अजून देखील पूर्ण न झाल्याने नागरीक त्रस्त आहेत. तसेच,२००७ पासून हा रस्ता बनविण्यात आला नव्हत, असा आरोप देखील स्थानिकांकडून करण्यात आला आहे. सध्या रस्त्याचे खोदकाम करुन ठेवले आहे. पण रस्त्याच्या कामात कुठेही मलः निसारण वाहीनी (सिवरेज) टाकण्यात आली नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.

“वारंवार आम्ही पत्राद्वारे, ईमेल, अधिकाऱ्यांना भेटून सिवरेज लाईनबाबत मागणी करत आहोत,. तसेच सिवरेज लाईनच्या मागणीबाबत लक्ष वेधण्याकरीता संविधानिक मार्गाने निदर्शने करत आहोत. परंतु महानगरपालिकेचे अधिकारी गुंडशाही पद्धतीने गुलामासारखी वागणूक देतात व आमची अत्यंत आवश्यक असलेली मागणी दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या ह्या रास्त मागण्यांकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे शिवसंग्राम संघटनेचे सदस्य राम भोईटे यांनी सांगितले.

या अनुषंगाने येत्या बुधवारी दिनांक ०७/०५/२०२५ रोजी सायं. ४ वा. पिंपरी पाडा भाजी मार्केट, मालाड (पूर्व), मुंबई ४०००९७ येथे महानगरापलिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाण करुन देण्यासाठी जागरण गोंधळ निदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?