आज मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी आमच्या नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली.
या प्रसंगी परभणी जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी ॲड. श्रीकांत विटेकर यांची निवड झाल्याबद्दल वहिनींनी मनापासून अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध विकास कामांबाबत सविस्तर चर्चा झाली. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, शेती व रोजगार निर्मिती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक संवाद साधत आगामी काळात गतीमान विकासासाठी चर्चा करण्यात आली.
यावेळी स्व.अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाची प्रेरणा घेत पुढील विकासात्मक वाटचाल करण्याचा संकल्पही केला. वहिनींच्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेत, जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत विकासाची गती अधिक वेगवान करण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲड. श्रीकांत विटेकर, नगराध्यक्ष अंकुशजी लाड, जि.प. सदस्य पंकज आंबेगावकर, दत्तराव जाधव, अजिंक्य नखाते, गणेश रणेर, बाळासाहेब कोल्हे, माणिक हरकळ, राकेश यादव यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी दादाराव ढवळे lok.मंच मराठी परभणी.





Users Today : 19