
नांदेड ग्रामीण पोलिसांनी जबरी चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई Maharashtra Police अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास नांदेड तालुक्यातील माणिकनगर परिसरातील शेतात दोन अनोळखी इसमांनी शेतकऱ्यांना अडवून त्यांच्या जवळील दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले होते. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे रवि उर्फ मुंडल भास्कर शिंदे (वय २०) व भास्कर सावता शिंदे (वय ५५), दोघेही रा. रिंगणगाव ता. जालना यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून चांदीचे पैंजण व इतर दागिने असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास नांदेड ग्रामीण पोलीस करीत आहेत.
लोकमंच मराठी न्युज -मुख्य संपादक राजेश लाठकर




Users Today : 19