नामदेव शास्त्री यांचा ज्ञानेश्वरीवर गाढा अभ्यास आहे, स्वतःला न्यायाचारी पदवी लावतात,त्यांनी कोणाला पाठिंबा द्यावा आणि कोणाचं समर्थन कराव हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. यनिमित्ताने ते राजकारणात आले आहेत,त्यामुळे कांही वेळा स्तुती आणि कांही वेळा टिका होईल या दोन्हीची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे.
त्यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा देण हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पंकजा मुंडेनी गडावरून राजकारण करायचं नाही म्हणू 2015 ला गडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेली दसरा मेळाव्याची परंपरा खंडित केली. आज 10 वर्षानंतर अशी काय घटना घडली की गडाचे दरवाजे राजकारणासाठी उघडे झाले. 2015 ला पंकजाला दसरा मेळावा गडाच्या पायथ्याशी घ्यावा लागला,2016 ला भगवान बाबांच्या जन्मगावी मेळावा घेतला आणि ती परंपरा चालू राहिली या सर्व गोष्टींचा मी साक्षीदार आहे. ज्या भगवान गडाने पंकजाला एकट सोडल त्याच भगवान बाबांच्या लाखो शिष्यांनी तिला तळ हातावर उचलून घेतलं. कारण भगवान बाबांचा खरा आशीर्वाद तिच्या पाठीशी होता. आज महंत आव्हान करतायत त्यात कांही वावग नाहीये,त्यांनी कराव. मात्र पंकजा ही केवळ महिला आणि आबला होती म्हणून तुम्ही तिला न्याय नाकारला का..?
मेळावा करण्याचा अधिकार नाकारला का..?
तुम्ही न्यायाचारी आहात तर तुमच्यासमोर न्याय करताना हा भेदभाव का आहे. ज्या ज्ञानेश्वरीमुळे तुम्हाला डॉक्टरेट मिळाली,त्या संत ज्ञानेश्वरांच आपली बहीण मुक्ताबाई विषयी काय वागणं होत हे जर तुम्ही डोक्यात ठेवलं असत तर तुम्ही पंकजाला नाकारलं नसत. या दुहेरी मापदंडाचे आपल्याकडे काय उत्तर आहे.असं काय मोठं दिव्य केलं की धनंजय मुंडे हे निष्पाप आणि निरपराध आहेत असं सर्टिफिकेट दिल. मी धनंजय मुंडेच्या मीडिया ट्रायलच्या विरोधात आहे. महाराष्ट्रात साधूसंत राजकारणात आले तर त्यानिमित्ताने चांगले माणसं येतील आणि वाईट माणसं दूर होतील.नायतर कसा भस्मासुर परळीत झाला आणि त्याने कसा बीड जिल्हा खाल्ला हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय.या भस्मासुराचा जन्मदाता कोण आणि त्याला या पापापासून सुटका आहे का. त्याला पोसलं आणि वाढवलं कोणी,त्याच्या तोंडाला रक्त कोणी लावल,हे आपत्य कोणाचं आहे, याची जबाबदारी कोण घेणार याची उत्तर महंत देणार आहेत का..? सत्तेच्या सिंहासनावर साधूत्व जरी आरूढ झालं तरी पिस गळतात ती साधूत्वाची.. आता त्यांनी राजकारणात पाऊल टाकलं आहे,लगेच पिस गळतील.




Users Today : 34