कल्याण मध्ये बुधवारी दुपारी लाल चौकी परिसरात निशा सोमेसकर आणि तिचा मुलगा अंश सोमेसकर हे रस्ता ओलांडत असताना एका भीषण अपघातात आई आणि तिच्या लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला होता.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा ट्रकने या दोघांना चिरडले होते या अपघातानंतर मनसे आणि स्थानिक नागरिकांनी गोंधळ घालून काही काळ रस्ता रोको केला होता तर स्थानिकाचा आणि मनसेचा आक्रोश पाहता आणि रस्ता रोको पाहता पोलिसांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा ट्रक चालक वैभव बाळू वैराळ याला ताब्यात घेऊन कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते माञ या वेळी पोलीस तपासाठी आवश्यक पुरावे मिळाल्याने न्यायालयाने या आरोपीला पोलीस कोठडी दिली नसून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणी बाजारपेठ पोलीस अधिक तपास करत आहेत.



