Home » Today In Focus » सलग तिसऱ्यादिवशी पाकिस्तानचा भारतावर अयशस्वी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न

सलग तिसऱ्यादिवशी पाकिस्तानचा भारतावर अयशस्वी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न

भारत-पाकिस्तान तणावाने टोक गाठलं आहे. पाकिस्तानने सलग तिसऱ्यादिवशी POK आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर सीजफायरच उल्लंघन केलय. पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती राज्यातील जवळपास 26 ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा नापाक प्रयत्न केला. सर्तक असलेल्या भारतीय सैन्याने त्यांचे हे सर्व प्रयत्न उधळून लावले. या दरम्यान पाकिस्तानने दावा केला आहे की, भारताने रावळपिंडीमधील नूर खान एअरबेस, शोरकोटमधील रफिकी एअर फोर्स तळ आणि मुरीद एअरफोर्स बेसला टार्गेट केल. भारताने या तिन्ही एअर बेसवर बॅलेस्टिक मिसाइलने हल्ला केला, असा पाकिस्तानने दावा केला आहे. दरम्यान पाकिस्तानकडून भारतावर फतेह-1 मिसाइलने हल्ला करण्यात आला. पण आपल्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानी फतेह-1 मिसाइल हवेतच नष्ट केलं. फतेह-1 ही बॅलेस्टिक मिसाइल असून ती खतरनाक मानली जाते

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?