पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान हाच दहशतवाद्यांना रसद पुरवत असल्याचे जागतिक मंचावर उघड झाले. पाकिस्तानची जगात नाचक्की होत आहे. या हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराचे थेट संबंध असल्याचे उघड झाले आहे. कात्रीत सापडलेल्या पाकिस्तानने आता नवीन कांगावा सुरू केला आहे. भारतच पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया करत असल्याच्या उलट्या बोंबा पाकिस्ताने सुरू केला आहे. अर्थात त्यांच्या या कोल्हेकुईचा जागतिक मंचावर काहीच उपयोग झाला नाही. त्यांच्या या दाव्यावर कोणत्याच देशाने प्रतिक्रिया न दिल्याने पाकिस्तानी सरकार आणि लष्कराला चांगलीच चपराक बसली आहे.

पाकिस्तान लष्कराच्या जनसंपर्क विभागाचे प्रमुख आणि महासंचालक (DG ISPR) लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतावर आरोप केला. पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यामागे भारत असल्याचे खापर लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी फोडले. विशेष म्हणजे चौधरी यांनी हा हवेत गोळीबार केला. त्यांनी भारताने कोणता हल्ला घडवून आणला. त्याचा कसा या हल्ल्यांमागे हात आहे, याची माहिती दिली नाही. त्यांनी कोणताही पुरावा दिला नाही. भारतावर खापर फोडण्यासाठी आयोजित या पत्र परिषदेत चौधरी हेच घामाघूम दिसले. त्यांच्या बोलण्यात कोणतीही धार नव्हती. केवळ कोल्हेकुई करण्यासाठीच त्यांना ही पत्रकार परिषद घ्यावी लागल्याचे दिसून येत आहे.




Users Today : 16