Home » Today In Focus » इंदिरा गांधींची आठवण करून देत राऊतांची मोदींवर खरमरीत टीका

इंदिरा गांधींची आठवण करून देत राऊतांची मोदींवर खरमरीत टीका

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नागरिकांमध्ये पाकिस्तानविरोधात प्रचंड असंतोष आहे. पाकड्यांना धडा शिकवण्याची मागणी सातत्याने जोर धरू लागली आहे. आज या हल्ल्याला 10 दिवस उलटून गेले आहे. सीमेवर तणाव आहे. पाकिस्तानमध्ये युद्धाची तयारी स्पष्ट दिसत असतानाच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी त्यांच्या नेतृत्व क्षमतेवरच थेट निशाणा साधला.

पहलगाम हल्ल्यात निरपराध 27 लोक मारले गेले. देशात संतापाची लाट आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला जे काही करायचे ते करा अशी सूट दिली आहे. त्यावर खासदार राऊत यांनी पंतप्रधानांवर जळजळीत टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व गुण आणि क्षमतेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो, असाच हा प्रकार असल्याची खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?