Home » Today In Focus » पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय

पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी नाव विचारत गोळीबार केला, या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील देखील सहा जणांचा समावेश आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत, दरम्यान हा हल्ला जेव्हा झाला, त्यावेळी आदिल सय्यद हुसेन हा तरुण देखील तिथेच होता, त्याने तेथील पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दहशतवाद्यांनी त्याच्यावर देखील गोळीबार केला. या घटनेत त्याचाही मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेनंतर आता आदिल हुसेन याच्या कुटुंबाला घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment