Home » Today In Focus » भाषा वादात बच्चू कडू आणि राज ठाकरे आमने सामने

भाषा वादात बच्चू कडू आणि राज ठाकरे आमने सामने

राज्य सरकारने सीबीएसई पॅटर्न लागू करण्याच्या उद्देशाने यंदाच्या वर्षापासून शाळेत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केली आहे. त्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्पष्ट शब्दात या निर्णयाला विरोध केला असून हा निर्णय न बदलल्यास संघर्ष अटळ असल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे, राज्य सरकार हा निर्णय कायम ठेवणार की बदलणार हे पाहावे लागेल. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदी ही देशाची भाषा आहे, आपल्या मुलांनाही हिंदी यायला पाहिजे, असे त्यांनी म्हटलंय. तर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील या निर्णयाला विरोध केला आहे. मात्र, सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या माजी आमदार बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी राज ठाकरेंना सवाल करत हिंदी भाषेच्या निर्णयाचा समर्थन केलं आहे. तुमची मुलं 10-10 भाषा शिकतात, मग गरिबांच्या मुलांनी का शिकू नये, असे कडू यांनी म्हटले.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?