पवार साहेबांनी अनेक वर्ष विकासकामं करण्याचा प्रयत्न केला, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यनी म्हंटलं आहे. मी देखील माझ्या परीनं विकासकामं करण्याचा प्रयत्न केला, असंही अजित पवार यांनी म्हंटलं आहे. बारामतीच्या ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर आज अजित पवार आहेत. यावेळी आयोजित एका सभेत पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. राज्याचं, जिल्हयाचं भलं व्हावं हीच मनात भावना असते, असं देखील वक्तव्य अजितदादांनी केलं आहे. दरम्यान, त्यांच्या या कौतुकाच्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.





Users Today : 26