Home » Today In Focus » करमाळ्यात राजकीय वातावरण तापले

करमाळ्यात राजकीय वातावरण तापले

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्याने अनेक राजकीय धक्के दिले. मित्र शत्रू झाले तर शत्रू मित्र झाले. संजयमामा शिंदे यांचा पराभव हा तर मोठा चर्चेचा विषय ठरला. सध्या करमाळ्यात आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच जिल्ह्याचा दौरा केल्याने ही निवडणूक राष्ट्रवादीतील दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. तर इतर आजी-माजी नेत्यांच्या भूमिकेमुळे चुरस वाढणार असल्याचं बोललं जातंय.

करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखाना दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे हा साखर कारखाना एकदा ताब्यात द्या, शेतकर्‍यांचा फायदा होईल असे आजी-माजी आमदार दावा करत आहेत. आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजयमामा शिंदे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढत होणार आहे.

Leave a Comment