Home » Today In Focus » ओबीसी नेत्याचा सुरेश धसवर गंभीर आरोप

ओबीसी नेत्याचा सुरेश धसवर गंभीर आरोप

खोक्या ऊर्फ सतीश भोसले प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस अडचणीत आले आहे. खोक्या भोसलेच्या हरणाच्या शिकार प्रकरणात सुरेश धस यांचे नाव घेतले गेले आहे. खोक्या हरणाचे मटण सुरेश धस यांनाही पोहचवत होता, असे गंभीर आरोप ओबीसी नेते टी.पी. मुंडे यांनी केले आहेत. टी.पी.मुंडे म्हणाले, खोक्या हरणाची शिकार करत होता. त्यानंतर त्याचे मास सुरेश धस यांना देत होता. या भागातील लोक हा प्रकार सांगतात.

टी.पी.मुंडे म्हणाले, जेव्हा मी त्या कुटुंबाला भेटायला गेलो होतो. त्यावेळी मला त्या कुटुंबांनी सांगितले की खोक्या हरणाची शिकार करत होता. त्याला आम्ही सांगितले की हरणाची शिकार करू नको तर त्यांनी आम्हाला मारहाण केली. खोक्याला सुरेश धस यांचे समर्थन आहे. त्या ठिकाणी दहा-बारा गावचे सरपंच जमा झाले होते ते पण सांगत होते. खोक्या सावकार हा नेहमी शिरूर तालुक्यात लोकांवर दमदाटी करत असतो. त्यासाठी खोक्याची पंधरा वीस जणांची टीम आहे, असे टी.पी.मुंडे यांनी सांगितले.

सुरेश धस सांगतात की खोक्या हा माझा कार्यकर्ता आहे. मग धसांनी त्याला हरणाची शिकार करु नको, असे का सांगितले नाही. हा संपूर्ण प्रकार सहानभूती मिळवण्यासाठी आहे. सुरेश धस हे सोंगाड्या आहेत. या सगळ्या टीमचा प्रमुख आहे, असे मुंडे यांनी म्हटले. सुरेश धस यांच्या आरोपावर म्हणाले, मुंडे म्हणजे काय परळीतले सगळे गुंडे आहेत का? तुमच्या खानदानामध्ये पूर्वीपासूनच गुंडगिरी मोठ्या प्रमाणात चालत होती आता आम्ही तुम्हाला म्हणावे का? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?