Home » Today In Focus » मुसलमानांना टार्गेट करण्यावरून शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी

मुसलमानांना टार्गेट करण्यावरून शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असून सभागृहात विविध मुद्यांवर चर्चा होत असताना सत्ताधारी आणि विरोधकही आमने-सामने आलेत. यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाज आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय शिरसाटांसह समाजवादी पक्षाचे रईस शेख यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. आज विधानभवन परिसरात जितेंद्र आव्हाड हे संविधानाची प्रत घेऊन दाखल झाले होते. हीच प्रत त्यांनी रईस शेख आणि शिरसाट यांच्या हातात दिली. संविधानाची प्रत दाखवून मुसलमानांचा त्यावर विश्वास नाही असं दाखवायचं आहे का तुम्हाला? असं सवाल संजय शिरसाट यांनी केला. इतकंच नाहीतर जाणूनबुजून तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता? असाही प्रश्न शिरसाटांनी यावेळी केला. यावर आव्हाड म्हणाले, आम्ही घटनेबरोबरच आहोत, आम्हाला या देशात ठेवा ना, आम्हाला मारण्यासाठी का टपलात तुम्ही? औरंगजेब हा औरंगजेब आहे. तो मुसलमानांचा नातेवाई नाही. औरंगजेबासाठी यांना का त्रास देताय? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी शिरसाट यांना विचारला

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?