Home » Today In Focus » सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ वर पुन्हा घणाघात

सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ वर पुन्हा घणाघात

दिशा सालियान प्रकरणावरुन सभागृहात बोलताना आमदार चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यात खडाजंगी झाली होती. यावेळी चित्रा वाघ यांनी, परब यांना, मी तुमच्या सारखे 56 पायाला बांधून फिरते, असं म्हंटलं होतं. त्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून चित्रा वाघ यांच्यावर बरीच टीका केली. आता सुषमा अंधारे यांनी पुन्हा चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. “टांगे आगे बढाने के लिए होती है, किसी के काम मे अडाने के लिए नही होती” असं सुषमा अंधारे चित्रा वाघ यांच्याबद्दल बोलल्या आहेत. “त्या बाईचा मेंदूच तेवढा आहे. शील, चारित्र्य, इमान हे शब्द उच्चारण्याची ज्यांची लायकी नाही. त्यांची लायकी संबंध महाराष्ट्राने ठरवून टाकली आहे” अशा शब्दात चित्रा वाघ यांच्यावर टीका केली.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?