मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी रविवारी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) रविवारी (दि.23) नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा (Kumbh Mela 2027) तयारीसंदर्भात आढावा बैठक घेणार असून, काही ठिकाणांना भेटी देणार आहेत. राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नाशिकमध्ये सिंहस्थ तयारीचा आढावा घेणार आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) दिला आहे. फडणवीस यांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, असे ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी म्हटले आहे. ठाकरे गटाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा वादात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्यानंतर नाशिकचा विकास झाला नाही. जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री नाही. महापालिकेच्या कामावर सत्ताधारी पक्षाचा अंकुश नाही, अशा विविध कारणांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याला विरोध केला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणारी सिंहस्थ आढावा बैठक होऊ देणार नाही, असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी दिला आहे.




Users Today : 34