छत्तीसगडमधील बिजापूर-दंतेवाडा आणि कांकेर- नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर आज झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 30 नक्षलवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. जवानांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम सुरु असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

जिल्हा राखीव रक्षक दल, विशेष कार्य दल आणि बस्तर फायटर्ससह संयुक्त सुरक्षा दलांनी नक्षल्यांविरोधात अभियान राबविले होते. यात बिजापूर जिल्हा राखीव दलातील एक जवान शहीद झाला. तर दुसरी चकमक कांकेर-नारायणपूर (अबुझमाड) जिल्ह्याच्या सीमाभागात उडाली. यात 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आले. दोन्ही घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, असे छत्तीसगड पोलिसांचे म्हणणे आहे.

Users Today : 38