दुहेरी रेल्वेमार्ग निर्माण करणे, अपघात प्रतिबंधक उपाययोजना राबवणे, स्थानकांचे आधुनिकीकरण आणि इतर महत्त्वाची विकासकामे वेळेत पूर्ण करता येतील. विलिनीकरणानंतर कोकण रेल्वेचे नाव तसेच राहणार असून त्याचे स्वायत्त अस्तित्व कायम ठेवले जाईल.

महाराष्ट्रासाठी कोकण रेल्वे महामंडळ महत्वाची संस्था होती. या महामंडळाने जगातील सर्वात खडतर मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकण रेल्वे मार्गाची निर्मिती केली होती. रायगड जिल्ह्यामधील मध्य रेल्वेवरील रोहा स्थानक येथून कोकण मार्ग सुरू होतो व कर्नाटकातील तोकुर येथे संपतो. २६ जानेवारी १९९८ रोजी खुल्या करण्यात आलेल्या कोकण रेल्वेची लांबी ७४१ किमी आहे. रेल्वे मॅन म्हणून जगभर प्रसिद्ध झालेले ई. श्रीधरन हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे पहिले अध्यक्ष होते. आता कोकण रेल्वे महामंडळ इतिहास राहणार आहे. या महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.




Users Today : 38