संबंधित महिलेची आणि आरोपीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी त्या महिलेस वारंवार मेसेज करत होता.
अहिल्यानगरच्या देहरे गावातील एका महिलेला बदनामी करण्याची धमकी देत तसेच तिच्या मुलाला मारण्याची धमकी देऊन महिलेला पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्वीर शेख, सोहेल शेख आणि अल्फेज शेख अशी आरोपींची नावे आहेत, त्यातील तन्वीर शेख याने संबंधित महिलेवर अत्याचार केल्याची फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान संपूर्ण घटनेनंतर गावात एकच संतापाची लाट उसळली आहे. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. एका महिलेसोबत परप्रांतीय मुस्लिम तरुणांनी असे कृत्य केले याच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे. जे मुस्लीम समाजाचे लोक गावात राहत आहेत त्यांच्या माध्यमातून परप्रांतीय मुस्लीम लोक गावात येऊन अतिक्रमण करतात, त्यांनी या भागात घर आणि व्यवसाय थाटले आहेत. याच लोकांकडून गावातील महिलेसोबत असा प्रकार करण्यात आलाय. आता मुस्लीम समाजाच्या अतिक्रमित घरांवर आणि व्यवसायावर प्रशासनाने बुलडोजर चालवावा, प्रशासनाने तसे केले नाही तर मंगळवारी हिंदुत्ववादी संघटना हे अतिक्रमण काढतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय.




Users Today : 39