Home » Today In Focus » धुळवडीला मटणाच्या दुकानांबाहेर लांबच लांब रांगा

धुळवडीला मटणाच्या दुकानांबाहेर लांबच लांब रांगा

आज धुळवडीचा सण असल्यामुळे खवय्यांकडून मांसाहारावर ताव मारला जाणार आहे. त्यामुळे मुंबई आणि नागपूरमध्ये सकाळपासूनच मटणाच्या दुकानांबाहेर रांगा लागलेल्या पहायला मिळत आहे.

मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी चिकन मटण दुकानाच्या बाहेर अर्ध्या किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत.महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांची वाढलेली संख्या पाहता सध्या मटणाचा भाव 780 रुपये किलो झाला आहे तरी देखील नागरिक रांगा लावून मटण खरेदी करताना दिसून येत आहेत.

धुळवळीचा सण म्हटला की अनेक मुंबईकर घरी मटणाचा बेत करतात. त्यामुळे मुंबईतील अनेक मटन शॉप च्या बाहेर मोठी रांग पाहायला मिळत आहे. अगदी सकाळपासून मटणाच्या दुकानावर ही रांग लागली आहे. सकाळी मटन घेऊन धुळवड खेळून मटणावर ताव मारण्याचा प्लॅन मुंबईकरांनी आखलेला दिसतोय.

मुंबईत मटणाचा भाव 840 रुपये किलो तर नागपूरमध्ये मटणाचा प्रतिकिलो भाव 880 रुपये इतका आहे. गर्दीमुळे अनेकांनी पहाटेच बाजारात जावून  मटणाची खरेदी केली आहे.

धुळवडीमुळे नागपूरात देखील मटणाच्या दुकानांत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आपला नंबर येण्यासाठी ग्राहकाला दोन ते तीन तासापर्यंत वाट पाहावी लागत आहे. धुळवडीमुळे मागणी वाढल्याने मटणाच्या दरात वाढ झाली आहे. नागपूरच्या रामेश्वरी भागातील एका मटन शॉपबाहेर ग्राहकांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?