मुंबईच्या खार पोलीस स्टेशनमध्ये यूट्यूबर रणवीर इलाहाबादीविरुद्ध तक्रार दाखल ….

मुंबईच्या खार पोलीस स्टेशनमध्ये, रिपब्लिकन सेनेतर्फे एका सामाजिक कार्यकर्त्याने यूट्यूबर रणवीर इलाहाबादीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या विवादास्पद विधानांमुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, पोलिसांनी याबाबत त्वरित कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.