GONDIA | गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाची हजेरी
गोंदिया जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी पडत असतानाच अचानकपणे वातावरणात बदल झाला असून आज सकाळी हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी, आमगाव तालुक्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः तूर, हरभरा व गहू या पिकांना या अवकाळी पावसामुळे फटका बसणार आहे.
Users Today : 24