शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्याचा नियम आहे. पण मुंबईत एका एका वाहतूक पोलिस हवालदाराने यावरुन महिला प्रवाशासोबत हुज्जत घातली. शासकीय कर्मचाऱ्याने मराठीत बोलण्याचा असा कोणताही नियम नसल्याच सांगत वाहतूक पोलिस हवालदाराने महिलेशी हुज्जत घातली. बुधवारी ही घटना घडली. गोरेगाव येथे राहणाऱ्या अनुप्रिया देसाई या बुधवारी दुपारी काही कामानिमित्त आपल्या वाहनाने बाहेर गेल्या होत्या. त्याचदरम्यान वाहतूक पोलिसांच्या गाडीने त्यांचे वाहन ओढून नेले.

त्यावेळी त्या गाडीजवळ पोहोचल्या असता पी. एन. साबळे (बक्कल क्र : 060265) हे हवालदार तिथे होते. त्यांच्याकडील स्पीकरमधून ते हिंदीमध्ये उद्घघोषणा करत असल्याचे त्यांनी पाहिले. तुम्ही मराठी घोषणा का करत नाहीत? अशी सातत्याने विचारणा अनुप्रिया देसाई यांनी केली. त्यावेळी मराठीत बोलण्याचा कोणताही नियम नसल्याचं साबळे यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांच्याकडील स्पीकरमध्ये तांत्रिक बदल केल्याचे देसाई यांनी सांगितले. देसाई यांनी या संपूर्ण घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण केलं आहे.




Users Today : 39