पवार कुटुंबीयांवर शोककळा; भारती पवार यांचं निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाऊजाय भारती प्रतापराव पवार (वय 77 वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे मुलगा ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सून मृणाल, नातवंडे जान्हवी आणि राहुल तसेच मुलगी अश्विनी, नातू झाकीर असा परिवार आहे. भारती पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी … Read more

20 विद्यार्थ्यांना फासावर लटकवणार…

बांगलादेशातील उच्च न्यायालयाने 20 विद्यार्थ्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. बांगलादेशात 2019 मध्ये झालेल्या हत्या प्रकरणाती ढाका उच्च न्यायालयाने 20 विद्यार्थ्यांना सुनावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. या विद्यार्थ्यांनी त्यांचा सहकारी असलेल्या अबरार फहद याची मारहाण करुन हत्या केल्याचा आरोप होता. याप्रकरणी ते दोषी आढळले आहेत. फहदने शेख हसीना सरकारविरोधात फेसबुक पोस्ट केली आहे. … Read more

खळबळजनक : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं

संबंधित महिलेची आणि आरोपीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी त्या महिलेस वारंवार मेसेज करत होता. अहिल्यानगरच्या देहरे गावातील एका महिलेला बदनामी करण्याची धमकी देत तसेच तिच्या मुलाला मारण्याची धमकी देऊन महिलेला पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्वीर शेख, सोहेल शेख आणि अल्फेज शेख अशी … Read more

खळबळजनक : शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. पंजाबमधील मोगाचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांच्यावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर खलिस्तानी … Read more

सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट…

सुप्रिया सुळे यांनी राज्यातील एका मंत्र्याविषयी गंभीर आरोप केले आहेत. त्यांचा राजकीय अंत लवकरच होईल असा दावा केला आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांवरही टीका केली आहे. शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे. त्यांचे नाव आत्ताच जाहीर करणे योग्य नाही, असा मोठा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. … Read more

कोंग्रेसला मिळत आहेत झटक्यावर झटके, 100 पदाधिकारी देणार राजीनामा

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्यासह शंभरहून अधिक पदाधिकारी येणाऱ्या काळात राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी रामराम करत सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. आता महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा राज्यात पक्षांतराचे वारे वाहू लागले … Read more

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, देहविक्री करणाऱ्यांमध्ये 4 अभिनेत्रींचा समावेश; दलाल अटकेत

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यावेळी श्याम सुंदर अरोरा नावाच्या एका दलालाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर महिलांना देहविक्री व्यवसायात ढकलल्याचा आरोप आहे.   मुंबई पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान चार महिलांची सुटका करण्या आली आहे. तसंच एका दलालाला अटक करण्यात आली आहे. पवई परिसरात हे … Read more

अंबरनाथमध्ये युवासेनेचा ‘युवा रंग महोत्सव’, डीजेच्या तालावर तरुणाईचा मोठा जल्लोष

अरविंद वाळेकर, राजू वाळेकर, निखिल वाळेकर यांची प्रमुख उपस्थिती

अंबरनाथमध्ये आज युवासेनेचा युवा रंग महोत्सव पार पडला. या महोत्सवात डीजेच्या तालावर तरुणाईनं ठेका धरत धुळवड साजरी केली. माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर, मनीषा वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर, युवासेना कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक आणि माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांनीही यावेळी तरुणाईसोबत ठेका धरला.
     अंबरनाथ पूर्वेच्या साई सेक्शनमधील अटल उद्यानात हा युवा रंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी डीजे बिन्नी आणि डीजे सिम यांनी एकापेक्षा एक गाणी वाजवत उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडलं. या कार्यक्रमाला तरुणाईने प्रचंड मोठा प्रतिसाद देत गर्दी केली होती. रेन डान्स, फूड स्टॉल्स यांचीही व्यवस्था यावेळी करण्यात आली होती. यावेळी या युवा रंग महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल निखिल वाळेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली ५० लाखांची खंडणी, बदलापूरचे माजी नगरसेवक शैलेश वडनेरेंसोबत घडला प्रकार

बदलापुरात माजी नगरसेवकाला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.बदलापूरमधील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना महिन्याभरापूर्वी एका अज्ञात नंबरवरून व्हॉट्सऍपवर एक व्हिडिओ आला, या व्हिडिओमध्ये त्यांचे अश्लील फोटो होते. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत समोरच्याने … Read more

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी साजरी केली धुळवड

जालन्याचे भाजप नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्साहात धुळवड साजरी केलीये. सहकाऱ्यांना रंग लावून दानवे यांनी धुलीवंदन सण साजरा केलाय. जालना जिल्हाभरात धुळवडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी आपल्या भोकरदन येथील निवासस्थानी संगीताचा मनमुराद आनंद घेऊन सहकाऱ्यांना कोरडे रंग लावून धुळवड साजरी केली आहे.