वक्फ बोर्डावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओवैसींची पहिली प्रतिक्रिया

गेल्या अनेक दिवसांपासून वक्फ सुधारणा विधेयक कायदा देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. काही दिवसांपूर्वी राज्यसभा तसेच लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले होते. मात्र या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात 40 पेक्षा अधिक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने वक्फ बोर्डावरील नव्या नियुक्त्यांसंदर्भात परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. … Read more

ट्रोलर्सवर भडकली सोनाक्षी सिन्हा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने गेल्या वर्षी जून महिन्यात बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी आंतरधर्मीय लग्न केलं. सोनाक्षी हिंदू आहे तर झहीर मुस्लीम आहे. यामुळे अनेकदा तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. परंतु सोनाक्षीसुद्धा अशा टीकाकारांना तिच्याच अंदाजात उत्तर देताना पहायला मिळते. नुकत्याच एका युजरने सोनाक्षीच्या एका फोटोवर तिच्या घटस्फोटाबाबत कमेंट केली. या कमेंटकडे दुर्लक्ष न करता सोनाक्षीने त्याला … Read more

संभाजीराजे यांचे वाघ्या कुत्र्यावर स्पष्टीकरण

“वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत मी सविस्तर सांगितलं आहे. कुठलाही इतिहास नसताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला दंतकथेतून निर्माण झालेलं ते पात्र आहे. पहिल्यादिवसापासून माझी भूमिका आहे, ते कुत्र हटवलं पाहिजे. तुकोजीराव होळकर महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला मदत केली. कुत्र्याच्या समाधीला मदत केली नाही. तुकोजी महाराजांच नाव सोनेरी अक्षरात लिहिलं पाहिजे, रायगड प्राधिकरणाचा अध्यक्ष या नात्याने … Read more

वक्फ कायद्याबाबत अपडेट

मोठी बातमी समोर येत आहे, नव्या वक्फ कायद्यातील दोन कलमांना सुप्रीम कोर्टाकडून तुर्तास स्थिगिती देण्यात आली आहे.  केंद्र सरकारला उत्तर देण्यास सात दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. केंद्र सरकारने जैसे थेच परिस्थिती ठेवावी असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी पाच मे रोजी होणार आहे. पाच मे रोजी दुपारी दोन वाजता या … Read more

मुंबई मेट्रोचा 150 किलोमीटरचा मार्ग पुढील वर्षापर्यंत होणार पूर्ण

मुंबई शहराच्या वाहतुकीसाठी क्रांतीकारी ठरणारा मेट्रो प्रकल्पाच्या जाळ्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा गुरुवारी पूर्ण झाला. मुंबई मेट्रो ७ अ या मार्गिकेवरील महत्त्वाचा बोगदा आज खणून पूर्ण झाला. या प्रकल्पाची पाहणी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते विमानतळ मार्गाचे एकत्रिकरण करण्याचा हा नवीन प्रकल्पाचा महत्वाचा टप्पा … Read more

कुमार मंगलम बिर्ला यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर

यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार’ जाहिर करण्यात आला आहे. यंदाचा यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना घोषित करण्यात आला आहे. मंगेशकर कुटुंबीयांनी परिपत्रकाच्या माध्यमातून पुरस्कारांची घोषणा केली आहे.दरम्यान कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह श्रद्धा कपूर, सचिन पिळगावकर, सोनाली कुलकर्णी यांना देखील पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. दीनानाथ मंगेशकर यांचा 83 वा स्मृतिदिन मुंबईतील … Read more

‘या’ तारखेपर्यंत  लिंक नाही केल्यास PAN Card  होणार बंद

तुम्ही अद्यापही पॅन आणि आधार लिंक केले नसेल तर ही बातमी वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला याचसंदर्भात महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. तुम्ही या नव्या डेडलाइनपर्यंतही पॅन आणि आधार लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड बंद होऊ शकते. सरकारने पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी आणखी एक डेडलाइन जारी केली आहे आणि पॅन कार्ड आणि आधार … Read more

अमित शाह आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचं वक्तव्य

अमित शाह हे शिंदे गटाच्या पक्षाचे प्रमुख आहेत. अमित शाह आणि मोदीच राज्यातील तिन्ही पक्ष चालवतात, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला होता. राऊत यांच्या या हल्ल्याचा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. होय, अमित शाह आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. तुम्हाला … Read more

फुले चित्रपटाच्या वादावर राज ठाकरेंनी केलं भाष्य, म्हणाले…..

फुले’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अनंत महादेवन आणि त्यांच्या टीमने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यासाठी ते राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पोहोचले होते. या भेटीदरम्यान यांनी चित्रपटासंदर्भात चर्चा केली. ‘फुले’ चित्रपटाबाबत राज ठाकरे यांची नेमकी भूमिका काय आहे हे त्यांनी जाणून घेतलं. यावेळी त्यांना चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा दाखवण्यात आला. महात्मा … Read more

महागाईचे दर घसरले

सर्वसामान्यांना महागाईच्या मोर्चावर मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशातील घाऊक महागाईत मोठी घसरण झाली. मंगळवारी सरकारी आकडेवारी समोर आली. त्यानुसार, भारतात घाऊक महागाई मार्च महिन्यात वार्षिक आधारावर महागाई 2.05 टक्क्यांनी घसरली. तर तज्ज्ञांनी महागाई 2.5 टक्के राहिल, असा अंदाज वर्तवला होता. सरकारी आकड्यांनुसार, अन्नपदार्थांचे उत्पादन, इतर उत्पादनं, खाद्य वस्तू, वीज आणि वस्त्र निर्मिती यांच्या … Read more