छाया कदमची वनविभागाकडून चौकशी

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी अभिनेत्री छाया कदम सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे अडचणीत सापडली आहे. छाया यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावरून वनस्पती आणि प्राणी कल्याण संस्थेनं ठाण्यातील वन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. “मी रानडुक्कर, ससा, घोरपड साळिंदर अशा प्राण्यांचं मांस खाल्लंय”, असं … Read more

सीमेवर सध्या प्रचंड तणाव

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवर युद्धाचे ढग दाटले आहेत. भारत कुठल्याही क्षणी हल्ला करेल असा पाकिस्तानकडून कांगावा केला जातोय. सीमेवर प्रचंड तणाव आहे. फायटर जेट्सचा आवाज ऐकू येतोय. अशा स्थितीत भारत-पाकिस्तान सीमेवर अमृतसर येथे दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF आणि पंजाब पोलिसांनी मिळून हे ऑपरेशन केलय. अमृतसरमधील भारोपाल गावातून मोठ्या प्रमाणात … Read more

पाकिस्तानी पत्रकारांवर भारताची मोठी कारवाई

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून अनेक प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये भारतीय लष्कर आणि सरकारविरोधात अपप्रचार करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. अशातच पाकिस्तानी पत्रकार आणि काही पीआर एजन्सीविरोधात केंद्र सरकार अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय लष्कर आणि  सरकारविरोधात सातत्याने अपप्रचार करणं पाकिस्तानी पत्रकार आणि काही पीआर एजन्सींना … Read more

सिंधू जल करार स्थगित करण्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची  प्रतिक्रिया

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सगळ्या देशात संतापाच वातावरण आहे. भारतातूनच नाही, परदेशात जिथे कुठे भारतीय वास्तव्याला आहेत, तिथून पाकिस्तान विरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे. पाकिस्तानला धडा शिकवा, भरपूर झालं, आत्ता यांना सोडायच नाही, अशीच सगळ्या देशाची भावना आहे. आज पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आठवडा होत आहे. अजूनही देशात वेगवेगळ्या ठिकाणी या दहशतवादी हल्ल्याविरोधात आंदोलन सुरु आहेत. … Read more

गुजरात टायटन्सचं प्लेऑफचं गणित बिघडलं

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 47व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा 8 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 209 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान राजस्थान रॉयल्सने 15.5 षटकात पूर्ण केलं. … Read more

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा: पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख देणार

जम्मू-काश्मीरच्या  पहलगाम येथे गेल्या मंगळवारी (22 एप्रिल)  झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

जाणून घ्या भारताच्या या ३ मिसाइल्सबद्दल

पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करुन पाकिस्तानने भारताला थेट आव्हान दिलं आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी 26 निरपराध भारतीय पर्यटकांची हत्या केली. त्यामुळे सगळा देश खवळला आहे. काहीही करुन पाकिस्तानला धडा शिकवा, पाकिस्तानच्या नांग्या ठेचा हीच एकमुख मागणी सुरु आहे. भारताने लष्करी कारवाई करण्याआधी सुरुवातीला डिप्मोमॅटिक स्ट्राइक केला. त्यानेच पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. सिंधू जल करार स्थगित … Read more

ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम हल्ल्याबाबत निषेध व्यक्त केला

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम हल्ल्याबाबत निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांची काय चूक होती? 26 वर्षानंतर पहिल्यांदाच काश्मीरमध्ये तीव्र संताप पाहिला. दहशतवाद्यांच्या विरोधात पहिल्यांदाच पूर्ण काश्मीर रस्त्यावर उतरलं आहे. मुख्यमंत्री म्हणून माझीही जबाबदारी होती. काश्मीरच्या प्रत्येक गावात हल्ल्याचा निषेध झाला आहे.” असं म्हणत त्यांनी या हल्ल्याबाबत संताप व्यक्त … Read more

सुप्रिया सुळेंची पहलगाम घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबासाठी सरकारला साद

सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्या म्हणाल्या “पहलगाम मध्ये दुखत घटना घडली. मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. त्या ठिकाणी 1 मे ला नागरिक शौर्य म्हणून पुरस्कार द्यावा अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी. ही वेळ टीका करण्याची वेळ नाही आम्ही भारत सरकार बरोबर आहोत. … Read more

बाजार समितीची सत्ता कोणाकडे जाणार?

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आणखी 3 जागांचे निकाल हाती आले आहेत. हमाल तोलार गटातून सचिन कल्याण शेट्टी पॅनलचे उमेदवार गफार चांदा विजयी झाले आहेत. तसेच विद्यमान संचालक तथा अपक्ष उमेदवार भीमा सीताफळे यांना पराभव सहन करावा लागला आहे. तर व्यापारी गटातून मुस्ताक चौधरी आणि वैभव बरबडे विजयी झाले आहेत. विविध कार्यकारी सोसायटीत कोण बाजी … Read more