Home » Other » सैराटची पुनरावृत्ती काही थांबेना

सैराटची पुनरावृत्ती काही थांबेना

राज्यात आणखी एक सैराट घडलाय. मुलीने प्रेम विवाह करताच निर्दयी बाप आणि भावाने गळा दाबून मुलीची हत्या केल्याची घटना घडलीये. मुलीच्या लग्नाची माहिती मिळताच आरोपी भानू राठोड आणि त्याचा मुलगा हिमांशू राठोड यांनी 12 मार्च रोजी सकाळी नेहाला पकडून तिची हत्या करून अंत्यसंस्कार केले.

मुलीनं दुसऱ्या जातीमधील मुलाशी प्रेमविवाह केल्यानंतर संतापलेल्या बाप आणि मुलानं अक्षता पडल्यानंतर अवघ्या 24 तासांच्याआत गळा दाबून मृतदेह सुद्धा जाळून टाकला. त्यामुळे आणखी एक सैराट प्रकरण समोर आलं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मुलीची हत्या केल्यानंतर दोघांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पकडले गेले. मारेकरी बाप लेकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित नेहा राठोडचे दुसऱ्या जातीतील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याने पिता-पुत्र खूश नव्हते. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये ही घटना घडली. बुधवारी पिता-पुत्राने ऑनर किलिंगच्या प्रकरणात हत्या केल्याचा आरोप आहे.

दुसऱ्या जातीतील मुलाशी प्रेमसंबंध असल्याने त्रास झाला
डीसीपी नोएडा सेंट्रल शक्ती मोहन अवस्थी यांनी सांगितले की, 23 वर्षीय नेहा राठौरचे उत्तर प्रदेशातील हापूर येथील रहिवासी असलेल्या सूरजसोबत प्रेमसंबंध होते आणि तिच्या कुटुंबीयांचा त्यावर तीव्र आक्षेप होता. नेहाच्या कुटुंबीयांनी तिला सूरजला भेटण्यापासून अनेक वेळा रोखले होते, परंतु तरीही तिने गाझियाबादच्या आर्य समाज मंदिरात 11 मार्च रोजी सूरजशी लग्न केले. लग्नाची माहिती मिळताच आरोपी भानू राठोड आणि त्याचा मुलगा हिमांशू राठोड यांनी 12 मार्च रोजी सकाळी नेहाला पकडून तिची हत्या करून अंत्यसंस्कार केले.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?