जालन्यातील औद्योगिक परिसरात असलेल्या विकास लाॕज परिसरातट्रक मालकाने ड्रायव्हरची हत्या केल्याची घटना दि.20 सोमवार रोजी साडेआठ ते नऊ वा. च्या सुमारास घडली.अझीम जमालुद्दीन शेख (वय 35) रा.कानपुर हल्ली मुक्काम चंदनझिरा, जालना असं मयताच नाव आहे.घटनेची माहिती मिळताच चंदनझीरा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह शासकीय सामान्य रुग्णालयात हलविले.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल,अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,उपविभागिय पोलीस अधीकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह चंदनझीरा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.यावेळी रात्री सव्वा अकरा वा. च्या सुमारास माध्यमांशी संवाद साधताना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल म्हणाले की सदरील प्रकरण हे जातीवादी किंवा धार्मिक स्वरूपाचे नसून वैयक्तिक कारणामुळे खून झाला असल्याची माहिती दिली. आरोपी निष्पन्न झाला असून आरोपीच्या शोधासाठी तीन पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली.




Users Today : 0